Ajit Pawar-Narendra Modi meeting : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार मंगळवारी (18 जुलै) प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. अजित पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या भेटीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या मांडणार आहेत. शुक्रवारी अर्थ आणि नियोजन खाते मिळालेल्या अजित पवार यांनी सांगितले की, खात्यांच्या वाटपामुळे राष्ट्रवादीचे आमदार खूश आहेत. अजित पवार यांच्यासह नऊ आमदार 2 जुलै रोजी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते.
अजित पवार म्हणाले, मी 18 जुलैला पंतप्रधान मोदींना भेटणार आहे. या बैठकीत मी त्यांच्यासोबत शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मांडणार आहे. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि मी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकीला उपस्थित राहणार आहोत. त्यांनी नाशिकमध्ये ‘शासन आपल्या दारी’ (सरकार तुमच्या दारी) कार्यक्रमात सहभागी होताना ही माहिती दिली.
अजित पवार गटाचे आमदार आज ना उद्या अपात्र होणारच; आव्हाडांचे मोठे वक्तव्य
ते पुढं म्हणाले की शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आता 28 कॅबिनेट मंत्री आहेत पण राज्यमंत्री नाही. मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 43 सदस्य असू शकतात. शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही होईल, अशी अटकळ होती, मात्र तसे झाले नाही. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणासह चार ते पाच मुद्दे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. ते म्हणाले की, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने मतदान यादी तयार करण्याचे आदेश जारी केले आहेत.
बंगळुरूच्या बैठकीसाठी काँग्रेसचे स्पेशल 26, आणखी दोन पक्षांना निमंत्रण
नाशिकमध्ये त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या पोस्टरमधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची फोटो गायब असल्याचे अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, “पवार साहेब आमचे प्रेरणास्थान, आमचे आदर्श आहेत. त्यांचा फोटो माझ्या केबिनमध्ये आहे.