चारवेळा आमदार केलंय, आठ मर्सिडीज दिल्या का ? संजय राऊतांचा नीलम गोऱ्हेंना सवाल

Sanjay Raut : नीलम गोऱ्हे यांना चारवेळा विधानपरिषदेचे आमदार केले. त्यांच्या आमदारकीला महिला आघाडीचा विरोध होता.

Sanjay Raut Neelam Gorhe

Sanjay Raut Neelam Gorhe

Sanjay Raut On Neelam Gorhe: दिल्लीत 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan) पार पडले. या संमलेनातील ‘असे घडलो आम्ही’ या मुलाखतीमध्ये शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी मोठा गौप्सस्फोट केला. ठाकरेंच्या शिवसेनेत (UBT) दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा दावा त्यांनी केला आहे. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नीलम गोऱ्हे यांना थेट सवाल केला आहे.

संजय राऊत म्हणाले, नीलम गोऱ्हे यांना चारवेळा विधानपरिषदेचे आमदार केले. त्यांच्या आमदारकीला महिला आघाडीचा विरोध होता. तरीही आम्ही चारवेळा आमदार केल्यानंतर त्यांनी आठ मर्सिडीज दिल्या का ? असा सवाल त्यांनी केल्या. त्या गाड्यांच्या पावत्या वगैरे घेऊन याव्यात त्यांनी, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर संयमी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, जाऊ द्या, महिला म्हणून आदर आहे. त्यांनी राजकारणात चांगभंल केलं आहे.

साहित्य महामंडळ विकले गेले, गोऱ्हेंकडून सदस्यांना 50 लाख अन् अध्यक्षांना मर्सिडीज; राऊतांचे उषा तांबेंना पत्र…


राऊत पत्रात नेमकं काय म्हणाले?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी थेट साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. दिल्लीतील साहित्य संमेलनात झालेले अनेक चर्चासत्र आणि परिसंवाद हे साहित्यबाह्य होते. एखाद्या राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली संमेलन आणि त्यातील कार्यक्रमांचे आयोजन झाले. साहित्य मंडळाच्या परंपरेस हे शोभणारे नाही. या चर्चा-परिसंवादात काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय वापर केला. तसेच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले, त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय?, असा सवालही राऊतांनी केला आहे. ३ फेब्रुवारी रोजी ‘असे घडलो आम्ही’ या परिसंवादात नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केली. साहित्य संमेलन हे राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले काय आणि सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे काय? नसेल तर साहित्य महामंडळाने त्वरित माफी मागावी, अशी मागणी राऊतांनी केली.

राजकारणी आणि साहित्यिक यांची लढाई झालीच पाहिजे; सुप्रिया सुळेंची स्पष्ट भूमिका


साहित्य महामंडळ विकले गेले…

नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बाहेर पडताच तालकटोरा मैदानाबाहेर पत्रकारांना सांगितले की, ‘मी महामंडळाच्या सदस्यांना ५० लाख रुपये देऊन या कार्यक्रमात सहभागी झाले आणि उषा तांबे यांना त्याआधी एक मर्सिडीज गाडी भेट देऊन या कार्यक्रमाचे आयोजन करायला लावले. हे खरे की खोटे माहित नाही, पण, महामंडळाच्या प्रतिष्ठेला त्यामुळं धक्का बसलाय. साहित्य महामंडळ विकले गेले आहे अशी चर्चा लोकांत होणे हे चित्र चिंताजनक आहे, असंही राऊत म्हणाले.

Exit mobile version