Amit Shah मुंबई दौऱ्यावर; राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे?

राज्यात गेल्या काही दिवसापासून अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलल्या गेल्या असल्या तरी आगामी काळात या निवडणूका पार पडतील. तसेच […]

Amit Shah : "POK भारताचा, तिथले लोकही आपलेच"; अमित शाहांनी पाकिस्तानला ठणकावलं

Amit Shah : "POK भारताचा, तिथले लोकही आपलेच"; अमित शाहांनी पाकिस्तानला ठणकावलं

राज्यात गेल्या काही दिवसापासून अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलल्या गेल्या असल्या तरी आगामी काळात या निवडणूका पार पडतील. तसेच लोकसभा निवडणुका काही महिन्यावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह सह्याद्री अतिथीगृहावर भाजपच्या महत्वाच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. अशी माहिती समोर येत आहे.

Devendra Fadanvis : सकाळी नऊचं बंद केलं तर… पत्रकार परिषदेवरून फडणवीसांचा राऊतांना टोला

मुंबई महापालिकेची तयारी?

यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महापालिका जिंकायची, असं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सांगितले आहे. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेत भाजपची सत्ता आणण्यासाठी आता केंद्रीय नेतृत्वही कामाला लागले आहे. कालच आशिष शेलार यांच्याकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी मुंबई महानगर पालिकेबद्दल आढावा घेतला होता. अमित शाह देखील आपल्या दौऱ्यात मुंबई महापालिकेचा आढावा घेतील.

याशिवाय आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकांचा देखील आढावा अमित शाह यांच्याकडून घेतला जाईल, असं सांगितलं जात आहे. याशिवाय भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी ‘मिशन ४५’ जाहीर केलं होत. त्याची देखील अमित शाह यांच्याकडून पाहणी केली जाईल.

कुणाल कामरा यांनी मोदी सरकारच्या नव्या आयटी कायद्याला कोर्टात दिलं आव्हान; कोर्टाने सरकारला सुनावलं

Exit mobile version