Amit Thackeray Aappeal To Stand With Maratha Protest : मुंबईच्या (Mumbai) आझाद मैदानावर सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठा प्रतिसाद मिळत (Maratha Protest) आहे. हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले असताना, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला चौथा दिवस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित राज ठाकरे (Amit Thackeray) यांनी फेसबुक पोस्टद्वारे महाराष्ट्र (Manoj Jarange Patil) सैनिकांना थेट आवाहन केले आहे.
राज्य नाट्य स्पर्धा: प्रवेशिका सादर करण्यासाठी आता 10 सप्टेंबरपर्यंतची संधी
ही जबाबदारी आपली…
अमित ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये मराठा बांधवांच्या संघर्षाचा उल्लेख करताना म्हटले आहे की, आज आंदोलनात उभे असलेले बांधव हे शेतकरी, मजूर, लहानशा जमिनीवर गुजराण करणारे, शिक्षणासाठी धडपडणारे युवक आहेत. म्हणजेच मराठा समाजातील प्रत्येक स्तरातील लोक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. ते आपल्या घरापासून, गावापासून, शेतापासून दूर येऊन इथे लढत आहेत. त्यांना काही कमी पडू नये, ही जबाबदारी आपली आहे.
आनंदाची बातमी! व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात, आजपासून नवीन दर लागू होणार
महाराष्ट्र सैनिकांना स्पष्ट सूचना –
1. आंदोलकांना अन्न-पाणी पुरवण्याची जबाबदारी घ्या.
2. औषधोपचारात कुठलीही अडचण येऊ देऊ नका.
3. त्यांच्या राहण्याची आणि सुरक्षिततेची काळजी घ्या.
4. एकही मराठा बांधव मुंबईत एकटा असल्याची भावना निर्माण होऊ देऊ नका.
लढाई जरी आरक्षणासाठी…
अमित ठाकरे म्हणाले, ते आपलेच आहेत. त्यांची लढाई जरी आरक्षणासाठी असली तरी ते आपली जबाबदारी आहेत. आपण महाराष्ट्र सैनिक म्हणून ही जबाबदारी पार पाडली पाहिजे. आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो, तर त्यांचं मनोबल दुप्पट होईल. शेवटी त्यांनी आपल्या आवाहनाचा शेवट ‘जय महाराष्ट्र’ या घोषणेसह केला.