Download App

कानाखाली आवाज काढून सांगावे लागेल, पवारांनी काय केलंय; अमोल कोल्हेंचा हल्लाबोल

Amol Kolhe : राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचा पनवेल येथे पक्ष मेळावा झाला. यावेळी खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटावर जोरदार हल्लाबोल केला. अमोल कोल्हे म्हणाले की आज शरद पवार यांनी काय केलं असं जेव्हा प्रश्ना विचारला जातो. तेव्हा समोर प्रश्न विचारण्या अगोदर कानाखाली जाळ काढून विचारावसं वाटतं की काय काय नाही केलं तेवढं सांग? असे त्यांनी म्हटले.

ते पुढं म्हणाले की कर्जतचे शिबीर झाले तेव्हा रायगडने डोळे वटारुन पाहिले. कारण ज्या रायगडच्या मातीचा उल्लेख केला, ज्या स्वाभिमानाच्या उदाहरणांचा उल्लेख केला. या रायगडाने कर्जतच्या शिबीरामध्ये नकली आयाळ लावलेले सिंह डरकाळी फोडताना पाहिले, तेव्हा त्या रायगडाने देखील डोळे वटारुन बघितलं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीच्या दरबारात स्वाभिमानाची डरकाळी फोडली होती. आणि आज त्याच दिल्लीश्वरांसमोर लोटांगणं घालणारी माणसं बोलत आहेत, अशी टीका अजित पवार गटावर अमोल कोल्हे यांनी केली.

लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय, तावडेंच्या विधानाने शिंदे-अजितदादांना धडकी

लग्न ठरवण्यापूर्वी नवरा आणि नवरीची पत्रिका पाहिली जाते. आता लोक म्हणाले की मत देण्यापूर्वी राजकारणी लोकांची आईस पत्रिका पाहिजे. कुठं ईडी, सीबीआय, इनकम टॅक्सचे गृह त्याच्या कुंडलीत तर नाहीत ना, कारण हे गृह त्यांच्या कुंडलीत असले तर ईडी, सीबीआय, इनकम टॅक्सचे गृह आले तर पहिले गृहण हे निष्ठेला लागते. त्यामुळे मतदान करण्यापूर्वी आईसची पत्रिका पाहायला विसरु नका, असे अमोल कोल्हे म्हणाले.

Tags

follow us