मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे सध्या दावोसच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरून आज परत एकदा संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
1 लाख 36 हजार कोटींचे उद्योग हे महाराष्ट्रात येत असतील तर त्याचे आम्ही स्वागत करू पण, त्याही पेक्षा गंभीर विषय म्हणजे, अडीच लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात होणार होती, ती आपल्या डोळ्यासमोर निघून गेली आहेत. यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी आणि उद्योग मंत्र्यांनी प्रयत्न केले नाही, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीका केली आहे.
फक्त 3 दिवसांमध्ये 1 लाख 36 हजार कोटींचे उद्योग जर महाराष्ट्रात येणार असतील, तर स्वागत करू, जर खरोखर हे प्रकल्प येत असतील तर स्वागत करायला काहीच हरकत नाही.
आम्ही जम्मू काश्मीरला जाणार आहे. तिथे शिख समाजांच्या लोकांशी भेट घेणार आहोत. काश्मिरी पंडित गेल्या काही दिवसांपासून सतत आंदोलन करत आहे, त्यांची भेट घेणार आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आहे, त्यामध्ये देखील आम्ही सामील होणार आहे, असंही राऊत यांनी सांगितले आहे.