Download App

‘उद्धव ठाकरे आणि केजरीवाल..,दोघांनाही भाजपचा बदला घ्यायचाय

प्रफुल्ल साळुंखे

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुंबईत सदिच्छा भेट झाली. खरंतर या भेटीत राजकीय भूमिका जाहीर झाल्या नसल्या तरी देशात स्थानिक प्रादेशिक पक्षाची अस्वस्थता वाढत चालली हे मात्र अधोरेखित होतेय. अरविंद केजरीवालांनी जो भेटीचा पुढाकार घेतला, तो उद्धव ठाकरे यांच्याकडून देशपातळीवर अपेक्षित होता. असो सुरवात ही अरविंद केजरीवाल यांनी केली. देशात भाजपापासून (BJP ) ज्या प्रमाणात मित्रपक्ष लांब गेले. भाजपाच्या वाटेत जे प्रादेशिक पक्ष अडथळा ठरतय अशा सर्वच राजकीय पक्षाच्या मागे भाजपने केंद्रीय एजन्सीच्या कारवाईचा सपाटा चालवला आहे. किंवा अनेक स्थानिक पक्षामध्ये फूट पाडली.

समता पार्टी, लोकजनशक्ती पार्टी, शिवसेना आता नीतिश कुमार जनता दल युनायटेड ही यादी वाढतंच आहे. प्रादेशिक पक्षात पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी अस्वस्थ आहेत. तेलंगणात राव यांनी भाजपसोबत उघड पांगा घेतला आहे. तामिळनाडूमध्ये भाषेच्या मुद्द्यावर, स्टालिन भाजपविरोधी भूमिकेत आहेत. अकाली दल भाजपापासून दूर आहे. महारष्ट्र उद्धव ठाकरे, राष्टवादी काँग्रेस शरद पवार, बिहारमध्ये लालू, नितीश, आणि उत्तर प्रदेशात अखिलेश असे सर्वच प्रादेशिक पक्ष या ना, त्या कारणाने अस्वस्थ आहेत.

यात सर्वाधिक भाजपाचंगड हा हिंदी बेल्ट अधिक महाराष्ट्र राहिला आहे. यातच सर्व प्रादेशिक पक्ष दुखावले आहेत किंवा अस्तित्वासाठी झगडत आहेत. हे केवळ प्रादेशिक पक्ष नव्हे तर भाजप अंर्तगत हिंदी बेल्टमध्ये नेत्यांची अस्वस्थता उफाळून येत असल्याचे चित्र आहे. राजस्थानमध्ये वसुंधरा राजे, युपीत राजनाथ सिंग आणि उपमुख्यमंत्री मौर्य, मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंग, महाराष्ट्रात नितीन गडकरी अशा दिग्गज नेत्याच्या कार्यकर्त्यामध्ये आपल्या नेत्यावर अन्याय होतो ही भावना उफाळून येते.

भाजपला असलेला विरोध हा प्रत्येक राज्यात असला तरी अजून तो संघटित नाही. थेट मोदी सोबत पांगा घ्यायची कुणाची ताकद नाही. या सर्व प्रादेशिक पक्षांचा काँग्रेसवर असलेला राग तसा कमी व्हायला तयार नाही, खरंतर काँग्रेस कमजोर झाली तर आपल्याला फायदा हा विचारच सर्व प्रादेशिक पक्षाना घातक ठरतोय. त्यामुळे सर्व प्रादेशिक पक्ष त्रस्त असून एका व्यासपीठावर यायला तयार नाहीत.

केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्या वतीने ती सुरवात झाली. सर्वच प्रादेशिक पक्षांनी महाराष्ट्र आणि दिल्ली एक राजकिय प्रयोगशाळा म्हणून चाचपणी केली तर देशभरात एक नवी राजकिय समीकरण समोर येईल. महाराष्ट्र आणि दिल्लीत रोजगार आणि व्यापारच्या दृष्टीने देशातील सर्वच प्रांतातून विस्थापन झाल आहे. ते राज्यात मतदार आहेत, यामध्ये पश्चिम बंगाल, युपी बिहारी, राजस्थानी, दक्षिण भारतीय, पंजाबी असा हा मोठा मतदार आहे. हे मतदार विखुरले असले तरी निवडून येणाऱ्या मतात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, जर राजकिय दृष्टया सर्वच स्थानिक प्रादेशिक पक्षानी अस्मिता जागृती सुरु केली तर एक मोठा बदल अपेक्षित आहे.

Arvind Kejriwal : पक्ष आणि नाव चोरलं… तरीही उद्धव ठाकरे वाघच

देशात गुजराती अस्मिते विरुद्ध एक वातावरण सुरु झाल आहे. काही गुजराती नेते देशातील सांस्कृतिक विविधता मोडून काढत आहेत. देशातल्या व्यापारावर गुजराती वर्चस्व, अनेक सवलतीत गुजराती व्यापारी ना झुकते माप, देशातील सर्वच कंत्राट गुजराती व्यापारीकडे, क्रिकेटवर छाप असे अनेक मुद्दे हळू- हळू गुजराती वर्चस्व विरोधात राज्या राज्यात हळू हळू जाणवू लागले आहेत. अंबानी, अदानी मुद्द्यावर जनतेची उमटणारी प्रतिक्रिया याची एक झलक आहे. ही सामाजिक अस्मिता, प्रादेशिक राजकिय अस्वस्थता, देशभरात मुस्लिम, दलित मताची बांधणी त्यात उद्धव ठाकरे यांचा मवाळ हिंदुत्वाची जोड अशा सर्वच मुद्याना एक व्यासपिठ मिळाला, तर एक मोठी भाजपाविरोधी लाट निर्माण होण्यास लागणार नाही. पण त्यासाठी पुढाकार घेणे गरजेच होत. तो केजरीवाल यांनी घेतला. खर तो उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षित होता.

Tags

follow us