Annabhau Sathe Sahitya Bhushan Award announced To Vikram Shinde : अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य या संस्थेचे 2025 चे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. या वर्षीचा ‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे साहित्य भूषण पुरस्कार’ (Annabhau Sathe Sahithabhushan Award) युवा साहित्यिक विक्रम शिंदे (Vikram Shinde) यांना जाहीर झाला आहे. मराठी साहित्य (Marathi Sahitya) विश्वात अत्यंत कमी वयात भरीव योगदानासाठी हा पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे.
अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना आणि पी. थो. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कराड येथे 1 जुलै रोजी या पुरस्काराने विक्रम शिंदे यांना गौरवण्यात येणार आहे. राज्यस्तरावर सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या कार्यकुशल व्यक्तींना दरवर्षी पुरस्कार देऊन गौरविले (Yuva Sahityik Vikram Shinde) जाते. रचनात्मक पातळीवर कार्य करणाऱ्यांनाच या पुरस्काराचा बहुमान मिळतो.
विक्रम शिंदे यांचे साहित्य क्षेत्रातील कार्य वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्या माध्यमातून संविधानिक मूल्यांवर आधारीत आजवर शेकडो दर्जेदार ग्रंथांची निर्मिती झाली आहे. त्यांनी 6 पुस्तकांचे लिखाण केले असून अनेक पुस्तकांचे संपादन ही केले आहे. शंभरहून अधिक युवा तरूणांना साहित्य क्षेत्रात यशस्वी कवी लेखक म्हणून घडविण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर 40 पेक्षा जास्त प्रकाशन संस्था नव्याने सुरू झाल्या आहेत. यातूनच अनेक युवक प्रकाशन व्यवसायात रचनात्मक काम करत आहे.
उष्णता वाढणार, घामाच्या धारा निघणार; काळजी घ्या, ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील आयोजक म्हणून असणारे त्यांचे बहुमूल्य योगदान, अनेक काव्य कट्टे, परिषदा, चर्चासत्रे, संमेलने तसेच एकंदरीत मराठी साहित्य चळवळीतील त्यांचे योगदान बहुमूल्य आहे. युवकांना या क्षेत्रात रोजगार कसा उभा करायचा, याचा योग्य मार्ग त्यांनी दिला आहे. कवी, लेखक, प्रकाशक, संपादक ते साहित्य चळवळ नव्याने चालू ठेवणारा एक सर्वसमावेशक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. साहित्य चळवळीतील त्यांच्या व्यापक योगदानाबद्दल हा पुरस्कार विक्रम शिंदे यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी स्वाभिमानी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष पिराजी थोरवडे आणि संयोजक लेखक सत्यवान मंडलिक यांनी दिली.