Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या भ्याड दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अहिल्यानगर, श्रीरामपूर आणि धुळे येथून गेलेले (Jammu Kashmir Attack) सहा तृतीयपंथी श्रीनगरमध्ये अडकले आहेत. त्यांनी याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यांनी व्हिडिओद्वारे महाराष्ट्र सरकारकडे मदतीची विनंती केली आहे. व्हिडिओमध्ये तृतीयपंथीयांचे अध्यक्ष काजल गुरू यांनी प्रशासनाला आवाहन केले आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल 28 नागरिकांचा दहशतवाद्यांनी बळी घेतला. महाराष्ट्रातील विविध भागातून पर्यटक काश्मीरमध्ये गेले होते. मात्र तिथे दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि क्षणार्धात या पर्यटकांचा जीव घेतला. या घटनेने संपूर्ण देशभरात संताप व्यक्त केला जात असून निष्पाप लोकांच्या मृत्यूने देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान पर्यटनासाठी गेलेले अनेकजण आजही त्याठिकाणी अडकून पडले आहे. यामध्ये नगर जिल्ह्यातील काही पर्यटक देखील आहे.
मोठी बातमी! बांदीपोरात लष्कर-ए-तैय्यबाच्या चार दहशतवाद्यांना पकडले; उधमपूरमध्ये चकमक
तृतीयपंथीयांचे अध्यक्ष काजल गुरू यांच्यासह अहिल्यानगरमधील चार तर धुळे येथील दोन असे सहा तृतीयपंथी जम्मू काश्मीरमध्ये अडकले असल्याचे समजते. यामध्ये अहिल्यानगर येथील काजल गुरू, कल्याणी नगर येथील आशू नगर, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील पिंकी गुरू, धुळे येथील पार्वती गुरू आणि साक्षी अशी या तृतीयपंथींची नावं आहेत. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे शासनाकडे मदतीचे आवाहन केले आहे.
आम्ही येथे अडकलो आहोत. बाहेर फारच भीतीचं वातावरण आहे. पोलीस बाहेर पडू देत नाहीत. आम्हाला महाराष्ट्रात येण्यासाठी रेल्वेची तिकीट मिळत नाही. विमान सेवा सुरू आहेत. मात्र, विमानाचं तिकीट दर जास्त असल्यानं आमची तिकीट खरेदी करण्याची परिस्थिती नाही. स्थानिक हॉटेल चालक आम्हाला मदत करत आहेत. मात्र, इथे भीतीचं वातावरण असल्यानं आम्ही अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप आणि महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की आम्हाला येथून आमच्या घरी सोडवा अशी विनंती काजल गुरू यांनी केली आहे.
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी सहली रद्द केल्या आहेत. अहिल्यानगरमधील सात जणांनी 24 एप्रिल रोजी श्रीनगरसाठी बुकिंग केले होते पण त्यांनी तिकीट रद्द केले. तसेच आठ जणांनी 1 मे साठी केलेले बुकिंगही रद्द केले. दरम्यान त्याठिकाणची परिस्थिती सुरळीत होण्यासाठी काही कालावधी जाणार आहे. तसेच झालेल्या या हल्ल्यामुळे अनेकांना भयभीत झाले आहे.