Pahalgam Attack : ‘हिंदू आहे सांगताच, अतिरेक्यांनी गोळी झाडली…’ अतुल मोनेंच्या कुटुंबाने सांगितला थरार

Atul Mone Family On Pahalgam Terror Attack : काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीतील अतुल मोने (Atul Mone) यांच्या कुटुंबियांनी हल्ल्याविषयी माहिती दिली आहे. कुटुंबियांनी सांगितले की, आम्ही तिकडे फिरायला गेलो होतो. त्या ठिकाणी दहशतवादी आले, त्यांनी फायरिंग सुरू केली. त्यांनी विचारलं यामध्ये हिंदू कोण आहे? मुस्लिम कोण आहे? सर्वात आधी संजय लेले यांनी हात वर (Pahalgam Terror Attack) केले. त्यांना लगेचच अतिरिक्यांनी गोळी मारली. त्यानंतर आमच्या समोरच लोकांवर गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांविरोधात (Terrorist) सरकारने ठोस कारवाई केली पाहिजे, अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे.
आम्ही फिरायला म्हणून गेलेलो होतो. आम्ही निघतंच होतो, तेव्हाच फायरिंग सुरू झाली. आम्हाला काहीच सुचत नव्हतं. आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे. घरातील कर्ता माणूस गेलेला आहे. त्यामुळे सरकारने योग्य पावलं उचलावीत असं, अतुल मोने यांच्या (Pahalgam Terror Attack At Jammu Kashmir) पत्नी अनुष्का मोने यांनी म्हटलंय. मोने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.
Beed Crime : लाथा मारून खाली पाडलं, मग दगडाने ठेचलं; माजलगावमध्ये भरदिवसा जीवघेण्या हल्ल्याचा थरार
तिथे आम्ही मिनी स्वित्झर्लंडला होतो. तेव्हा अचानक गोळीबार सुरू झाला, काहीच समजत नव्हतं. मी दोघांना बघितलं, त्यांच्या हातात बंदूक होती. ते गोळीबार करत होते. विचारत होते की, कोण हिंदू आहेत, कोण मुस्लिम आहे? संजयकाकांनी ( Atul Mone Family) हात वर करताच त्यांना गोळी मारली. माझे बाबा देखील तिथे गेले. त्यांना बोलले आम्ही काहीच नाही करत, पण त्यांनाही गोळी मारली. माझ्यासमोरच गोळी मारली. मी काहीच करू शकले नाही. मी त्यांना उठवायला गेले पण ते उठतच नव्हते, असं अतुल मोने यांची मुलगी ऋचा मोने हिने म्हटलंय.
तिथे दोन ते तीन हजार पर्यटक होते. अचानक गोळीबार झाला. दोघेजण समोर आले, त्यांच्या हातात रायफल होती. ते सगळे पाहून नागरिक घाबरले होते. घोडेस्वारांना पळून लावण्याचा प्रयत्न होता. हेमंत जोशी म्हणाले आम्ही काही केलेलं नाही, आम्हाला सोडून द्या. त्यांनी लगेच जोशींच्या डोक्यात गोळी झाडली. त्यांनी हिंदू अन् मुस्लिमांना तिथे वेगळं करण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणत्याच पर्यटकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर माझ्या बहिणीचे पती अतुल मोने यांनी म्हटलं की, प्लिज आम्हाला सोडून द्या. आमच्यावर गोळीबार करू नका. दहशतवाद्यांनी विचारलं की हिंदू कोण अन् मुस्लिम कोण? माझ्या जिजूंनी हात वर करताच, लगेच त्यांच्यावर गोळीबार केला अन् ते खाली पडले. सगळ्या महिलांसमोर हा प्रकार सुरू होता, असं अतुल मोने यांच्या पत्नीचे भाऊ प्रसाद सोमण यांनी म्हटलंय. पूर्ण जगात चौथ्या क्रमांकाची आपली आर्मी आहे. मग सुरक्षा व्यवस्थेत आपण कुठे कमी पडतोय का, असा देखील सवाल त्यांनी केलाय. हिंदू आहोत, ही आमची चूक झाली का, असं देखील त्यांनी विचारलं आहे.