Pahalgam Terror Attack : ‘ गुडघ्यावर बसवलं अन् कलमा म्हणायला लावलं’ पर्यटकाने धर्म सांगताच दहशतवाद्यांनी झाडल्या गोळ्या

Terrorists forced tourists recite kalma then shot dead : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे 27 जणांचा मृत्यू झालाय. काल बैसरन व्हॅलीमध्ये हा दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये इंदूर येथील रहिवासी सुशील नथानिएलची गोळी झाडून हत्या करण्यात आली. तसेच या हल्ल्यात त्यांची मुलगी आकांक्षा जखमी झालीय. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी (terrorists) सुशील नथानिएलला प्रथम गुडघे टेकण्यास भाग पाडले. यानंतर त्यांना कलमा (kalma) म्हणण्यास सांगण्यात आले. मग धर्माबद्दल विचारले असता, सुशीलने ख्रिश्चन धर्म असल्याचं सांगितलं. त्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घालून ठार मारले. या घटनेत मुलगी आकांक्षा हिच्या पायाला गोळी लागली.
‘जर कलमा पठण केलेस तर सोडून देवू…’ हे त्या दहशतवाद्यांचे आदेश होते. ज्यांनी इस्लामचे कार्यकर्ते असल्याचे भासवून जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामला भेट देणाऱ्या पर्यटकांना हे आदेश दिले होते. दहशतवाद्यांनी प्रथम पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले, नंतर त्यांना पवित्र कलमाचे पठण करण्यास सांगितले. जेव्हा त्यांनी कलमा पठण केले नाही, तेव्हा क्रूर दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या, अशी माहिती समोर आली आहे.
या दहशतवादी घटनेनंतर पवित्र कलमाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. ‘कलमा म्हणजे काय आणि इस्लाममध्ये त्याचे महत्त्व काय आहे?’ ‘एखाद्याला कलमा म्हणण्यास भाग पाडले जाऊ शकते का?’ ‘जर कोणी कलमा म्हणत नसेल तर त्याला मारले पाहिजे का?’ कुराण, हदीस आणि इस्लामिक श्रद्धांनुसार या प्रश्नांची उत्तरे समजून घेऊया.
इस्लाममध्ये कलमाचं महत्त्व काय?
इस्लामिक विद्वान गुलाम रसूल देहलवी म्हणाले की, इस्लामची स्थापना पैगंबर मोहम्मद यांनी केली होती. त्याचे पाच स्तंभ म्हणजे कलमा, नमाज, रोजा, जकात आणि हज आहेत. यापैकी कलमा हा इस्लामचा पहिला सिद्धांत आहे. कल्माचा इस्लामी अर्थ ‘शहीद’ म्हणजे ‘साक्ष’ किंवा ‘शपथ’ असा आहे. ते म्हणतात की, ज्याप्रमाणे पोलीस अधिकारी, न्यायाधीश किंवा मंत्री आपले कर्तव्य बजावण्याची शपथ घेतात, त्याचप्रमाणे इस्लाम स्वीकारणाऱ्या व्यक्तीला इस्लामचा पाया असलेल्या कलमावर दृढ विश्वास ठेवावा लागेल.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला संपूर्णपणे भारत सरकार जबाबदार, पाकिस्तानचे गंभीर आरोप
सहा कलमे इस्लामच्या संपूर्ण संकल्पनेचे वर्णन करतात. यामध्ये कलमा तय्यब, कलमा शहादत, कलमा तमजीद, कलमा तौहीद, कलमा इस्तिगफर आणि कलमा रद्दे यांचा समावेश आहे. हे जीवन आणि मृत्यू, स्वर्ग आणि नरक, अल्लाहची भक्ती, पैगंबरत्वाचा शेवट इत्यादी महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करतात. इस्लाममध्ये कलमाला महत्त्वाचे स्थान आहे. इस्लाम स्वीकारण्यासाठी, सर्वात आधी कल्मा तैय्यबा वाचणे आवश्यक आहे, हे दोन भागात पठण केले जाते.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना कलमा म्हणण्यास भाग पाडले. प्रश्न असा आहे की, एखाद्याला कलमा म्हणण्यास भाग पाडून त्याचे इस्लाम धर्मात रूपांतर करता येते का? याला उत्तर म्हणून इस्लामिक धार्मिक नेत्यांनी पवित्र कुराणातील वचनांचा हवाला दिलाय. त्यांनी असे करणे पाप असल्याचं म्हटलंय. इस्लाममध्ये कोणत्याही प्रकारची कडकपणा किंवा सक्ती नाही. त्यांनी पवित्र कुराणातील सुरा बकराच्या 256 व्या आयताचा उल्लेख केलाय. त्यांनी म्हटलंय की, या आयतमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे. इस्लाम धर्मात कोणत्याही प्रकारची सक्ती नाही.