Pahalgam Terror Attack : थांबा! बाहेर फायरिंग सुरुयं; हॉटेल मालकामुळे जीव वाचला, बुलढाण्याच्या पर्यटकाने सांगितला थरार

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) सात ते आठ दहशतवाद्यांनी दहशतवादी हल्ला करुन 26 पर्यटकांचा जीव घेतल्याची घटना घडली. हल्ल्यादरम्यान, या दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळ्या झाडल्याचा दावा पर्यटकांकडून करण्यात आलायं. अद्यापही अनेक पर्यटक जम्मू काश्मीरात अडकले असून महाराष्ट्रातील बुलढाण्यातून गेलेल्या पर्यटकांने समाजमाध्यमांवर आपला व्हिडिओ शेअर करीत हॉटेलमालकाच्या सतर्कतेमुळे आम्ही पाच जणांची जीव वाचला असल्याची कबुली दिलीयं.
थांबा! बाहेर फायरिंग सुरुयं; हॉटेल मालकामुळे जीव वाचला…
हॉटेलमालकामुळे आमच्या कुटुंबाचा जीव वाचला. शासनाने आम्हाला सुखरुप पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी बुलढाण्याचे पर्यटक निलेश जैन यांनी केलीयं. #PahalgamTerroristAttack #pahalgamattack #jammukashmirterrorattack pic.twitter.com/d0fe8RH3JD
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) April 23, 2025
बुलढाण्याती जैन कुटुंबिय जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. यावेळी त्यांनी एका हॉटेलमध्ये जेवण करुन बाहेर पडण्याची योजना आखली. बुलढाण्याती जैन कुटुंबातील एकूण पाच जण जम्मू काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. निलेश जैन, पारस अरुण जैन, ऋषभ अरुण जैन, श्वेता निलेश जैन, अनुष्का निलेश जैन, अशी त्यांची नावे असून जेवणासाठी हॉटेलमध्ये ते थांबले होते. जम्मू काश्मीरमधील सर्व ठिकाणी फिरुन झाल्यानंतर 21 तारखेला रात्री पहलगामध्ये हॉटेलला आले. 22 तारखेला दुपारी जेवण केल्यानंतर हे जैन कुटुंबिय फिरण्यासाठी बाहेर पडणार होते. त्याचवेळी हॉटेल मालक आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी आम्हाला बाहेर फायरिंग सुरु असल्याची कल्पना दिली. बाहेर फायरिंग सुरु आहे, त्यामुळे तुम्ही बाहेर पडू नका, असं हॉटेलमालकाने सांगितलं आणि आमचा जीव वाचला, असल्याचं निलेश जैन यांनी सांगितलंय.
दहशतवाद्यांनी धर्म विचारून पतीवर झाडल्या गोळ्या; पत्नीने सांगितला थरारक घटनाक्रम…
आम्ही कुटुंबातील पाच जण जम्मू काश्मीरला पर्यटनासाठी आलो होतो. हॉटेलमालकाने फायरिंगबाबत सांगितल्याने आमचा जीव वाचला आहे. त्यानंतर आम्ही बातम्या पाहिल्यानंतर फायरिंग असल्याचं निश्चित झालं. आम्ही हॉटेलमध्येच थांबलो. काही वेळानंतर फायरिंग बंद झाली. आता सध्याही आम्ही हॉटेलमध्येच असून शासनाने आम्हाला सुखरुप घरी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी निलेश जैन यांनी व्हिडिओ शेअर करीत केलीयं.
महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू
जम्मू काश्मीरमील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे भारतामध्ये संतापाची लाट आहे. मंगळवारी दहशतवाद्याने २6 पर्यटकांचा जीव घेतला. नाव विचारले, आयडी पाहिले अन् धडाधड गोळ्या झाडल्या. पोलिसांच्या वेशात आलेल्या या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश आहे. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. मित्रांसोबत ते फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते, पण त्यांची ती ट्रीप अखेरची ठरली.