दहशतवाद्यांनी धर्म विचारून पतीवर झाडल्या गोळ्या; पत्नीने सांगितला थरारक घटनाक्रम…

Pahalgam Terrorists Attacked Terrorists shot at husband after asking religion wife narrates thrilling incident : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terrorists Attacked) येथे आज दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला असून या हल्य्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे तर 20 जखमी झाले आहे. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाच्या हिट स्क्वॉड द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने घेतली आहे. तर या हल्ल्यामध्ये अनेक थरारक हत्या झाल्याचं समोर आलं आहे. एका दाम्पत्यातील पतीला त्याचा धर्म विचारला अन् त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. याचा थरारक घटनाक्रम पत्नीने सांगितला आहे.
पत्नीने सांगितला थरारक घटनाक्रम…
जम्मू-काश्मीरमधील पहेलगामच्या दहशतवादी हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर येत आहेत. यामध्येच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक महिला एक थरारक घटनाक्रम सांगत आहे. ती महिला सांगत आहे की, दहशतवादी तिच्या पतीवर गोळीबार करत त्याला ठार केले. हा हल्ला करण्याच्या अगोदर हे दाम्पत्य भेलपुरी खात होतं. त्यावेळी या दहशतवाद्यांनी त्यांना त्यांचा धर्म विचारला. तुम्ही मुस्लिम आहात का? असं विचारल्यानंतर यांनी आपला धर्म सांगितला आणि त्यानंतर त्यांनी आपल्या पतीला मारल्याचं ही महिला सांगत आहे.
https://x.com/LetsUppMarathi/status/1914680564126228522
सैन्य अन् पोलिसांच्या गणवेशात दहशतवाद्यांचा हल्ला, दोन विदेशी नागरिकांसह 27 पर्यटकांचा मृत्यू
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, या धक्कादायक घटनेमध्ये महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहे. दिलीप डिसले, अतुल मोने असं मृत्यू झालेल्या पर्यटकांचं नाव आहे. तर या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. तर दुसरीकडे जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Video: तुम्हें नहीं मारेंगे, जाओ मोदी को बता दो… मंजुनाथ यांच्या पत्नीला दहशतवादी काय म्हटले ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स वर पोस्ट करत लिहिले की, पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.