मोठा दहशतवादी कट उधळला ! जैश मॉड्यूलकडून 2 हजार 900 किलो स्फोटके जप्त
Jaish-e-Mohammed: एका आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केलाय. या कारवाईत तब्बल 2 हजार 900 किलो स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी एक मोठी दहशतवादविरोधी कारवाई केलीय. जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि अन्सार गजवत-उल-हिंदशी (AGuH) संबंधित एका आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केलाय. या कारवाईत तब्बल 2 हजार 900 किलो स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. तर दोन डॉक्टरांसह सात जणांना अटक करण्यात आलीय. त्यानंतर दिल्लीत कार स्फोट झाला आहे. त्यामुळे हे स्फोटके आणि दिल्लीतील स्फोटचा संबंध आहे का याचा शोध आता तपास यंत्रणांना घ्यायचा आहे. (Inter-state terror module linked with terrorists organisations Jaish-e-Mohammed (JeM) and Ansar Ghazwat-ul-Hind (AGuH) busted)
हळूहळू कार चालली अन् स्फोट झाला; दिल्लीतील स्फोट म्हणजे सुसाईड बॉम्बरच ?
Inter-state terror module linked with terrorists organisations Jaish-e-Mohammed (JeM) and Ansar Ghazwat-ul-Hind (AGuH) busted. pic.twitter.com/TNSd8PGV7g
— J&K Police (@JmuKmrPolice) November 10, 2025
या आरोपींकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा, अंदाजे 2 हजार 900 किलो आयईडी बनवण्याचे साहित्य जप्त केलेत. ही कारवाई जम्मू आणि काश्मीर आणि फरीदाबाद पोलिसांनी संयुक्तपणे केलीय. फरीदाबाद येथील डॉ. मुजमिल अहमद गनई आणि कुलगाम येथील डॉ. आदिल यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. या व्यक्ती परदेशी हँडलर्सच्या संपर्कात होती आणि सामाजिक आणि शैक्षणिक नेटवर्कद्वारे निधी उभारत होते.
मोठी बातमी! दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात स्फोट, 9 जणांचा मृत्यू
स्विफ्ट कार आणि साहित्य जप्त
पोलिसांनी एक स्विफ्ट कार जप्त केली. या गाडीतून एक क्रिंकोव्ह असॉल्ट रायफल, तीन मॅगझिन आणि 83 राउंड जप्त करण्यात आले. एक पिस्तूल, आठ राउंड, दोन मॅगझिन आणि दोन रिकामे गोळे देखील सापडले. ही सर्व शस्त्रे त्याच स्विफ्ट कारमधून जप्त करण्यात आली. जी अल फलाह विद्यापीठात काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरची असल्याचे सांगितले जाते. पोलिस सध्या तिची चौकशी करत आहेत.
स्फोटके आली कुठून ?
मुजमिलच्या ठिकाणाजवळ असलेल्या धौज परिसरातील एका ठिकाणी लपण्याच्या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा सर्वात मोठा खुलासा झाला. आठ मोठ्या आणि चार लहान सुटकेसमध्ये लपवून ठेवलेले सुमारे 360 किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आलंय. हे स्फोटक सुमारे 15 दिवसांपूर्वी मुझम्मिलपर्यंत पोहोचले होते. धौजमधील खोलीतून 20 टायमर आणि 20 बॅटरी देखील जप्त केल्या आहेत. मुझम्मिलने ही खोली फक्त स्फोटके लपवण्यासाठी भाड्याने घेतल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
