मसूद अजहर भावालाही गमावणार, ऑपरेशन सिंदूरमध्ये कंदहार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रऊफ गंभीर जखमी

Operation Sindoor : भारतासाठी मोस्ट वॉन्टेड असलेल्या जैश ए मोहम्मदचा (Jaish-e-Mohammed) म्होरक्या मसूद अजहरवर (Masood Azhar) भारतीय लष्कराने न विसरता येणारा घाव घातला. ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवताना भारताने जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयच उडवले. यात मसूदच्या कुटुंबातील दहा लोकही ठार झाले. यात मसूद अजहरचा भाऊ रुऊफ (Rauf Azhar) गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. त्याला आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मोठी बातमी! पाकिस्तानचा भारताच्या 15 शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न; एस 400 ने हाणून पाडला
रऊफ हा कंदहार विमान अपहरणाचा मास्टरमाइंड आहे. अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचे नाव पुढे आलं होतं. ७ मे रोजी रात्री उशीरा झालेल्या भारत सरकारच्या लष्करी कारवाईत मसूद अजहरचे कुटुंब उद्ध्वस्त झालं. या हल्ल्यात अजहरच्या कुटुंबातील दहा सदस्य आणि चार जवळच्या सहकाऱ्यांसह एकूण चौदा जण ठार झाल्याचे वृत्त आहे. याबाबत जैश-ए-मोहम्मदने याबएक निवेदन जारी करून या घटनेची पुष्टी केली होती.
मोठी बातमी, पाकिस्तानी एअर डिफेन्स उद्ध्वस्त, भारताचा थेट लाहोरवर ड्रोन हल्ला
दहशतवादी संघटनेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या हल्ल्यात मसूदच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचा मृत्यू झालाय. तर कुटुंबातील अनेक सदस्य जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये रउफचा समावेश आहे. हल्ल्यात कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाल्यानंतर मीही मेलो असतो तर बरे झाले असते, असं मसूद अजहर म्हणाला.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू राबवलं. या कारवाईअंतर्गत, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. रात्री १.३० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिलं. या हल्ल्यात आतापर्यंत ९० दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे.
पहलगाममध्ये झाला होता पर्यटकांवर हल्ला…
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जण ठार झाले होते आणि १७ जण जखमी झाले होते. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला होता, ज्यामध्ये दहशतवाद्यांनी निवडक लोकांना लक्ष्य केले होते.