Shahir Dinanath Sathe Passed Away : शाहीर दीनानाथ साठे-वाटेगावकर (Shahir Dinanath Sathe Passed Away ) यांचे आज 29 डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीनानाथ साठे हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नात्यातील होते. तसेच त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील वाटेगाव हे होतं. पुणे जिल्हा परिषदेतून उपजिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्यानंतर पत्नी, दोन मुलं, दोन मुली आणि नातवंड असा परिवार आहे.
राम मंदिर सोहळ्याला सोनिया गांधी जाणार? काँग्रेसकडून सस्पेन्स कायम…
दीनानाथ साठे यांच्या कार्याबद्दल सांगायचं झालं. तर महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या माध्यमातून शाहीर यांना न्याय मिळावा. यासाठी विधानसभेवर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व अध्यक्ष शाहीर योगेश आणि सरचिटणीस म्हणून दीनानाथ साठे यांनी काम पाहिलं होतं. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती, अण्णाभाऊ साठे फाउंडेशन, वीर लहुजी वस्ताद प्रतिष्ठानच्या कार्यात देखील त्यांचा सक्रिय सहभाग होता.
व्हॉट्सअॅपमध्ये येणार अॅपलसारखे फीचर्स! व्हिडिओ कॉल सुरू असताना करता येणार ऑडिओ-व्हिडिओ शेअर
त्याचबरोबर महाराष्ट्र शाहीर परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यांच्या कार्याची दखल घेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासणाच्या वतीने त्यांना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर 1956 मध्ये साठे हे वाटेगावहून पुण्यामध्ये शिक्षणासाठी आले होते शिक्षण घेत असतानाच त्यांनी केटी मंगल विद्यार्थी मंडळ मधून सामाजिक कार्याला सुरुवात केली त्यावेळी त्यांच्यासोबत टीडी गायकवाड दादासाहेब पवार शंकरराव मात्रे हे देखील होते.
त्यानंतर त्यांनी खासदार आप्पासाहेब मोरे, खासदार देवराम कांबळे, आमदार तात्यासाहेब भिंगारदिवे यांना एकत्र आणत मातंग समाजाचे संघटन संघटन केले. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या शाहिरीचा पगडा असल्याने दीनानाथ साठे हे देखील शाहिरीचे जतन करण्यासाठी हातामध्ये डफ घेतला आणि 1969 पासून अखेरपर्यंत त्यांनी शाहिरीचे शेकडो कार्यक्रम केले.