व्हॉट्सअॅपमध्ये येणार अॅपलसारखे फीचर्स! व्हिडिओ कॉल सुरू असताना करता येणार ऑडिओ-व्हिडिओ शेअर

  • Written By: Published:
व्हॉट्सअॅपमध्ये येणार अॅपलसारखे फीचर्स! व्हिडिओ कॉल सुरू असताना करता येणार ऑडिओ-व्हिडिओ शेअर

WhatsApp New Feature Testing : आज स्मार्टफोन वापरत नाही, असा माणूस शोधूनही सापडणार नाही. स्मार्टफोन घेतल्यानंतर मोबाईलमध्ये पहिले अॅप डाऊनलोड केल्या जातं, म्हणजे व्हॉट्सअॅप. कारण व्हॉट्सअॅप (WhatsApp) यूजर फ्रेंडली आहे. दरम्यान, आता व्हाट्समध्ये नवीन फिचर येत आहे. WhatsApp ने अलीकडेच iOS वर नवीनतम बीटा आवृत्ती 23.25.10.71 आणली आहे. मेटाच्या मालकीच्या या इन्स्टंट मेसेजिंग अॅपमध्ये नवीन अपडेटसोबत एक नवीन फीचरही आले आहे. आता व्हॉट्सअॅप वापरकर्ते व्हिडिओ कॉल दरम्यानही ऑडिओ आणि व्हिडिओ शेअर करू शकतील.

अरबाजच्या लग्नानंतर पहिली पत्नी मलायकाचा लग्नाबाबत मोठा खुलासा; म्हणाली, ‘कोणी विचारले तर..’ 

गुगल मीट, झूम, मायक्रोसॉफ्ट टीम्स, स्काईप सारख्या अॅप्सवर स्क्रीन शेअरिंग फीचर तुम्ही पाहिले असेल. आता लवकरच व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल दरम्यान स्क्रीन शेअरिंगची सुविधाही दिली जाणार आहे. सध्या त्याची बीटा आवृत्तीवर चाचणी सुरू आहे. हे फिचर युजर्संना व्हिडिओ कॉल दरम्यान संगीत ऑडिओ शेअर करण्यास अनुमती देईल. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, हे फीचर iOS आणि Android दोन्हीवर विकसित केले जात आहे.

Ayodhya : 7000 निमंत्रित, 3000 VIP, पण गर्भगृहात असणार केवळ 5 व्यक्ती; काय आहे कारण 

येत्या काही दिवसांत, हे वैशिष्ट्य जगभरातील सामान्य वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केले जाऊ शकते. याशिवाय, Apple च्या SharePlay सारखे हे वैशिष्ट्य लवकरच Android प्लॅटफॉर्मवर देखील आणले जाऊ शकते.

व्हॉट्सअॅपचे हे नवीन फीचर कसे काम करते?

व्हॉट्सअॅपचे नवीन ऑडिओ शेअरिंग फीचर वापरण्यास अगदी सोपे आहे. व्हिडिओ कॉल दरम्यान वापरकर्ते सहजपणे त्यांची स्क्रीन इतर वापरकर्त्यांसोबत शेअर करू शकतात. व्हिडिओ कॉल दरम्यान तुम्हाला व्हॉट्सअॅपवर जो व्हिडिओ शेअर करायचा आहे तो प्ले करा. त्यानंतर व्हॉट्सअॅप ऑडिओसोबत स्क्रीनवर दिसणारा कंटेंट ट्रान्सफर करेल.

काय फायदा होईल?

तुम्हाला अचानक काही ऑफिसचे काम करायचे असेल, तुमच्या मोबाईलची गॅलरी, व्हिडीओ, पीपीटी वगैरे इतर कोणाला दाखवायचे असेल तर हे काम तुम्ही व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनच करू शकता. तसेच, जर तुम्हाला एखाद्याला स्मार्टफोन वापरण्यासाठी मदत करायची असेल तर अशा वेळीही तुम्हाला या फीचरचा फायदा होईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज