Ayodhya : 7000 निमंत्रित, 3000 VIP, पण गर्भगृहात असणार केवळ 5 व्यक्ती; काय आहे कारण

  • Written By: Published:
Ayodhya : 7000 निमंत्रित, 3000 VIP, पण गर्भगृहात असणार केवळ 5 व्यक्ती; काय आहे कारण

Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन (Ayodhya Ram Mandir) सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, 22 जानेवारीला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. प्राणप्रतिष्ठेवेळी मंदिराच्या मुख्य गर्भगृहात केवळ पाचच व्यक्ती उपस्थित असणार आहेत. ज्यात प्रमुख यजमान म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) असणार आहे. मोदींशिवाय गर्भगृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास हे उपस्थित असतील. मंदिराच्या गर्भगृहात केवळ मोजक्याच व्यक्ती सहभागी होणार असल्याने यातून भाजपकडून मोठे राजकीय संदेश तर देण्याचा प्रयत्न करत नाहीये ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : श्रीरामांच्या त्रेता युगाची आठवण करून देणारं अयोध्या स्टेशन!

पीएम मोदी असणार मुख्य यजमान

22 जानेवारीला होणाऱ्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात मुख्य यजमान म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. सुप्रीम कोर्टाने राम मंदिराच्या बाजूने निर्णय दिला असला तरी, भाजप नेते भव्य राम मंदिराचे स्वप्न साकारण्याचे श्रेय पंतप्रधान मोदींना देत आहेत. 5 ऑगस्ट 2020 रोजी मोदींनी रामजन्मभूमी येथे भूमिपूजन करून राम मंदिराची पायाभरणी केली आणि आता प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात मुख्य यजमान म्हणून उपस्थित राहणार आहेत. यामुळे अयोध्येत राम मंदिर उभारणीची मोहीम अडवाणी-अटल बिहारी वाजपेयींसह भाजपने पुढे नेली असली तरी, मंदिर प्रत्यक्षात साकारण्याचे काम मोदींनी केले आणि याचे श्रेय नेहमीच त्यांना दिले जाईल असे दिसून येते.

संघप्रमुख मोहन भागवत असणार उपस्थित

गर्भगृहात मोदींशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे देखील उपस्थित असणार आहेत. राम मंदिराच्या उभारणीत आणि ते भव्य रूपात साकारण्यात संघाचे मोठे योगदान असल्याचे मानले जाते. 5 ऑगस्ट 2020 रोजी राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी सर संघचालक मोहन भागवत म्हणाले होते की, हा अनेक प्रकारे आनंदाचा क्षण असल्याचे म्हटले होते. तसेच अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील असे तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरसजी म्हणाले होते, अशी आठवण भागवत यांनी सांगितली होती. त्यानंतर आता 22 जानेवारी रोजी संघप्रमुख मोहन भागवत यांची गर्भगृहात उपस्थिती किती महत्त्वाची आहे याचा संदेश देणारा आहे.

Ram Mandir : अडवाणींनी रथयात्रा काढली अन् राम मंदिर निर्माणची लाट पसरली…

आनंदीबेन पटेलांच्या माध्यमातून महिलांना संदेश

22 जानेवारीला राम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि मोहन भागवत यांच्यासोबत आनंदीबेन पटेलही उपस्थित राहणार आहेत. आनंदीबेन पटेल या यूपीच्या राज्यपाल म्हणून यावेळी उपस्थित असतील. गर्भगृहात पटेल या एकमेव महिला असतील ज्यांच्या माध्यामातून देशातील अर्ध्या लोकसंख्येला भाजपच्या सत्तेत महिलांना किती महत्त्व आहे असा संदेश सत्ताधाऱ्यांकडून दिला जात आहे.

योगींची उपस्थिती आणि केमिस्ट्री

रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेवेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील मोदींसोबत गर्भगृहात उपस्थित असणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून प्रोटोकॉलनुससार योगी आदित्यनाथ यांना परवानगी मिळाली असेल. पण त्याशिवाय मोदी आणि आदित्यनाथ यांच्यातील उत्तम समन्वय आणि केमिस्ट्री दर्शविणे हा संदेश देण्याचा प्रयत्न आहे. तर, 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनदेखील याकडे बघितले जात आहे.

राम मंदिराचा मॅप आला समोर! 70 एकरच्या एरियात भक्तांना मिळणार ‘या’ सुविधा; सचिवांनी दिली माहिती

कारण, लोकसभेच्या 80 जागा उत्तर प्रदेशातून येतात आणि भाजपला केंद्रात सत्तेत येण्यात या राज्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपचे लक्ष विशेषत: यूपीवर आहे. सत्तेत आल्यापासून योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येला सुशोभित करण्यात योगींनी कोणतीही कसर सोडलेली नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज