मोठी बातमी : मोदी सरकारला EC चा झटका; ‘विकसित भारत’ चे मेसेज पाठवणं त्वरित थांबवण्याचे निर्देश

  • Written By: Published:
मोठी बातमी : मोदी सरकारला EC चा झटका; ‘विकसित भारत’ चे मेसेज पाठवणं त्वरित थांबवण्याचे निर्देश

नवी दिल्ली : ऐन निवडणुकांच्या तोंडावर निवडणूक आयोगाने मोदी सरकारला (Modi Government) मोठा झटका दिला असून, कोरोडो मतदारांच्या व्हॉट्सअपवर पाठवण्यात येणारे ‘विकसित भारत’ चे मेसेज त्वरित थांबण्याचे निर्देश आयोगाने माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला दिले आहेत. सार्वत्रिक निवडणुका 2024 ची घोषणा झाली आहे. तसेच आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. मात्र, त्यानंतरही अशा स्वरूपाचे मेसेज फोनवर येत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्यानंतर हे मेसेज पाठवणं त्वरित बंद करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला दिले आहेत. (Stop Sending ‘Viksit Bharat’ Messages On WhatsApp Says Election Commission To Centre)

मतदारांच्या मोबाईलवर पाठवण्यात  निवडणूक आयोगाने मंत्रालयाकडून या प्रकरणाचा अनुपालन अहवालही मागवला आहे.पाठवण्यात आलेले मेसेज आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पाठवण्यात आलेले आहेत. मात्र, संदेश प्राणालीगत आणि नेटवर्क मर्यादांमुळे विलंबाने नागरिकांना वितरित केले जात असल्याचे स्पष्टीकरण संबधित मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.

पोस्टर छापायलाही पैसे नाहीत, लढणार कसं?; निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचं कंबरडं मोडलं

पाठवण्यात येणाऱ्या ‘विकसित भारत’ च्या मेसेजमध्ये नेमकं काय होतं?

देशातील करोडो देशवासियांच्या व्हॉट्सअपवर सातत्याने ‘विकसित भारत’ चे संदेश मिळत होते. यात  नमस्कार, हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारच्या विकसित भारत संपर्क केंद्राकडून पाठवण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला होता. गेल्या 10 वर्षात देशातील 140 कोटींहून अधिक नागरिकांना भारत सरकारच्या योजनांचा थेट लाभ झाला आहे आणि भविष्यातही त्यांचा लाभ मिळत राहील. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी तुमचा पाठिंबा आणि सूचना अत्यंत आवश्यक असल्याने या योजनांबाबत तुमची मते कळवण्याची विनंती देशवासियांना करण्यात आली होती.

मोठी बातमी : निवडणुकांच्या तोंडावर मोदींना दिलासा; ECs नियुक्ती कायद्यावर बंदी घालण्यास SC चा नकार

विकास भारत संपर्क नावाच्या या व्हॉट्सॲप चॅनेलच्या माध्यमातून केंद्र सकारचा करोडो लोकांशी जोडण्याचे प्रयत्न केले जात होते. या अंतर्गत कधी ऑडिओ क्लिप पाठवून केंद्रांच्या योजनांवर प्रतिक्रिया मागवण्यात येत आहेत तर, कधी मजकुराच्या माध्यमातून सूचना मागवल्या जात आहेत. एवढेच नव्हे त, नुकत्याच पाठवण्यात आलेल्या एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून देशवासियांना तुम्ही मोदी सरकारच्या कुटुंबातील सदस्य आहात की नाही, हो की नाही असा प्रश्न देखील विचारण्यात आला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज