Download App

अण्णाभाऊंच्या पुतळ्याचं अनावरण शासकीय पद्धतीनेच; आमदार काळेंच्या ग्वाहीने उपोषण मागे

अण्णाभाऊंच्या पुतळ्याचं अनावरण शासकीय पद्धतीनेच होणार असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली, त्यानंतर मातंग समाज बांधवांनी उपोषण मागे घेतलंय.

Mla Aashutosh Kale : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण शासकीय पद्धतीनेच नातू सचिनभाऊ साठे यांच्या हस्ते होणार असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे (Mla Aashutosh Kale) यांनी दिल्यानंतर मातंग समाज क्रांती मोर्चाचे उपोषण मागे घेण्यात आलंय. दरम्यान, अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण शासकीय पद्धतीनेच अण्णाभाऊंचे नातू सचिनभाऊ साठे यांच्या हस्ते करण्यात यावे, या मागणी मातंग समाज बांधवांकडून उपोषण करण्यात आले होते. अखेर आमदार काळे यांनी उपोषणाची दखल घेत तत्काळ प्रश्न मार्गी लावलायं.

मोठी बातमी : कैद्यांना जातीवर आधारित कामाचे वाटप बंद करा; सु्प्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

कोपरगावमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती उभारण्यात आलायं. या पुतळ्याचं अनावरण शासकीय पद्धतीनेच सचिनभाऊ साठेंच्या हस्ते करण्यात यावं, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून मातंग समाजाकडून होत होती. या मागणी मातंग समाजाने उपोषणाचा पवित्रा घेतला. आमदार काळे यांना यासंदर्भात समजतात त्यांनी तत्काळ उपोषणस्थळी धाव घेत कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला सूचना केल्या आहे. तसेच यासंदर्भातील लेखी स्वरुपात माहितीदेखील आंदोलकांना दिलीयं.

‘लाडक्या’ बहिणीला एक रुपया देता अन् दहा रुपये घेता; नाना पटोलेंनी सांगितला हिशोब

यावेळी मातंग समाजबांधवांची प्रमुख मागणी केल्यानंतर इतरही मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, अशी मागणीही आमदार आशुतोष काळे यांच्याकडे करण्यात आलीयं. इतर मागण्यांबाबत बोलताना आशुतोष काळे यांनी लवकरच पूर्ण करणार असल्याचं आश्वासन दिलंय. यावेळी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे उपस्थित होते. साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण होणार असल्यामुळे मातंग समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांनी आमदार काळे, नगराध्यक्ष विजय वहाडणे व कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाचे आभार मानले आहे.

follow us