‘लाडक्या’ बहिणीला एक रुपया देता अन् दहा रुपये घेता; नाना पटोलेंनी सांगितला हिशोब
Nana Patole News : लाडक्या बहिणीला एक रुपया देत अन् दहा रुपये घेता, या शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सत्ताधारी सरकारवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन टीका केलीयं. दरम्यान, राज्यातील महागाईच्या मुद्द्यावर बोलताना नाना पटोले यांनी सरकारला चांगलच धारेवर धरलंय. ते मुंबईत बोलत होते.
‘सावरकरांबद्दल आदर म्हणूनच मी 1983 ला …’, आत्मचरित्रात सुशीलकुमार शिंदेंनी केला मोठा खुलासा
नाना पटोले म्हणाले, लाडक्या बहिणींना या सरकारने दीड हजार दिले खर पण बहिणींच्या खिशातून किती रुपये काढले याचं उत्तर सरकारने द्याव, कारण राज्यात तेलाच्या किमंतीत भरघोस वाढ झाली असून इतरही गोष्टींमध्ये वाढ झाली आहे. लाडक्या बहिणींना एक रुपया देता अन् दहा रुपये घेता हे बहिणीला आता कळालं आहे, लाडक्या बहिणींना सरकारकडून लॉलीपॉप देण्याचा प्रयत्न असल्याची टीका नाना पटोले यांनी केलीयं.
तसेच राज्य सरकार राज्यातील गरीब, बेरोजगार, महिलांना लुटत असून लाडक्या बहिणींना थोडं दिलं पण महागाई वाढवून बहिणईंना लुटालया सरकारने सुरुवात केलीयं. त्यासाठी सरकारकडून जाहिरातबाजीतून जनतेची लुट सुरु आहे, पण आता राज्यातील जनता सरकारला घरी पाठवण्यासाठी वाट पाहत असल्याचीही टीका नाना पटोले यांनी केलीयं.
मनमौजी मराठी चित्रपटातून उलगडणार नात्यांची रंजक गोष्ट, नोव्हेंबरमध्ये योणार प्रेक्षकांच्या भेटीला
निवडणुकीच्या रणनीतीचं काम सुरु असून जागावाटपाचंही सुरु झालंय. आमची मित्रपक्षांच्या प्रमुखांशी चर्चा सुरु झालीयं. पुढील आठवड्यात आम्ही बैठक घेणार असून दसऱ्यापर्यंत चर्चा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मित्रपक्षांशीही मेरिटच्या आधारावरच जागावाटपावर चर्चा सुरु आहे, जागावाटपावरुन महाविकास आघाडीत कुठलाही वाद नसून विरोधकांमध्ये वाद सुरु असल्याचा टोलाही नाना पटोले यांनी लगावलायं.