Download App

Video : कपाळाच्या टिकल्या काढल्या अन् ‘अल्ला हू अकबर’ म्हटलं पण..पवारांना सांगितली आपबिती…

Sharad Pawar Meet Kaustubh Ganbote Wife In Pune : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात पुण्याचे कौस्तुभ गणबोटे (Kaustubh Ganbote) यांचा देखील मृत्यू झालाय. त्यांच्या घरी शरद पवार (Sharad Pawar) यांनी भेट दिली. यावेळी कौस्तुभ गणबोटे यांची पत्नी भावूक झाली होती. त्यांनी शरद पवार यांच्यासमोर अंगावर काटा आणणारा पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) अनुभव सांगितला आहे.

कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी म्हणाल्या की, आम्हाला बऱ्याच लोकांनी मदत केली. सैन्य दलाची देखील मदत झाली, पण ती उशिरा झाली. तोपर्यंत हे गेले होते. माझ्या समोर गोळ्या घातल्या. तुम्ही अजाण वाचा म्हणून सांगत होते. आम्ही तिथं असलेल्या (Pune News) सगळ्या महिलांनी मोठ्या-मोठ्या अजाण म्हटलं, पण त्यांनी आमच्या माणसांना मारून टाकलं.

उष्णता वाढणार, घामाच्या धारा निघणार; काळजी घ्या, ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट

तिथे गेटवर एक मुस्लिम होता, तो म्हणत होता तुम्ही कशाला निरपराध लोकांना मारता त्यांनी काय चुकी केली आहे? त्याला सुद्धा पुढे करून गोळ्या घातल्या. आम्ही तिथं घोड्यावर बसून गेलो, तरी आम्हाला भीती वाटत होती. आम्ही पळत सुटलो तिथून तर चिखलात गुडघ्याइतके पाय खाली रुतत होते.

आमचे घोड्यावाले मुस्लिम होते, पण ते खूप चांगले होते. ते आम्हाला हल्ला झाल्यानंतर घ्यायला आले. त्यांचा मित्र बाजूला होता, त्याला बोलावून घेतलं आणि म्हणाला ‘अजान पढता है क्या, पढता है क्या कुछ?’ त्यांचं बोलणं ऐकून आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या. आम्ही सगळे ‘अल्लाह हू अकबर’ म्हणायला लागलो.

भारताने अटारी बॉर्डर का बंद केली? पाकिस्तानच्या कोंडीसाठी मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; प्लॅनही रेडी

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे पार्थिव पुण्यात आणण्यात आले. नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अश्रूंनी श्रद्धांजली वाहिली. तेव्हा विमानतळावर मोठी शोककळा पसरली. लष्कर आणि पोलिस अधिकाऱ्यांनीही सैनिकांना त्यांच्या सन्मानार्थ सलामी दिली.

देशाचे स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश दुःखी आहे. पहलगाम या पर्यटन स्थळाला ज्या पद्धतीने लक्ष्य करण्यात आले त्यावरून हे दिसून येते की, हा हल्ला पूर्णपणे हमास मॉड्यूलने केला होता. त्यानंतर तपास यंत्रणा या हल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचीही चौकशी करत आहेत. या दहशतवादी हल्ल्यात 28 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. अनेक जण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत.

 

follow us