Pahalgam Terror Attack : पाकिस्तानला धडकी; इलाका तुम्हारा धमाका हमारा, भारताकडून मोठे संकेत

Pahalgam Terror Attack : पाकिस्तानला धडकी; इलाका तुम्हारा धमाका हमारा, भारताकडून मोठे संकेत

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवाद्यांनी (Pahalgam Terror Attack ) भ्याड हल्ला करत 26 नागरिकांचा जीव घेतलायं. या घटनेनंतर भारताच्या बाजून मोठ-मोठ्या हालचाली सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भारत सर्जिकल्स स्ट्राईकची पुनरावृत्ती करणार असल्याचे मोठे संकेत दिसून येत आहेत. त्यामुळे आता दहशतवादी हल्ल्यानंतर भारत प्रत्युत्तरात नेमकं काय करणार? याकडं संपूर्ण जगाच लक्ष लागून राहिलंय.

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी उच्चस्तरीय बैठक बोलवली आहे. या हल्ल्यानंतर अमति शाह तत्काळ घाटीला पोहोचले आहेत. हल्ल्यानंतर अमित शाह स्वत: लक्ष देत असून काश्मीरमध्ये एलजी मनोज सिन्हा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत शाहा यांनी बैठक घेतलीयं. बैठकीत अमित शाह यांनी कोणालाही सोडायचं नाही, असा थेट इशाराच अधिकाऱ्यांना दिला आहे. तसेच आतंदवादापुढे आपण झुकणार नाही, असंही ठणकावून सांगितलंय. घाटीमधील वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर पुढील रणनीती ठरवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. या हल्ल्यानंतर भारताकडून मोठे संकेत देण्यात आले आहेत.

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यानंतर सऊदी अरबचा पुढील दौरा रद्द केलायं. मोदी यांनी सऊदी अरबहून दौरा रद्द करीत तत्काळ भारतात धाव घेतलीयं. एअरस्पेसने न येता पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या रुटने दिल्लीत दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदींच्या या पाऊलामुळे पाकिस्तानला थेट इशाराच दिला असल्याचं बोललं जातंय. दिल्लीत पंतप्रधान मोदी कॅबिनेट कमिटी सिक्योरिटीची बैठक घेणार आहेत. कॅबिनेट कमेटी ऑन सिक्योरिटी सर्वाधिक उच्चस्तरीय समिती आहे. ही समितीत सुरक्षेच्या दृष्टीने मोठे निर्णय घेत असते.

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सैन्य दलाची बैठक घेतली आहे. या बैठकीत सिंह यांनी सेना प्रमुखांना तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहे. पुढे सरकार जो निर्णय घेईल त्यानंतर सूचनेचे पालन तिन्ही सैन्याकडून करण्यात येणार आहे. दरम्यान, मागील काळात भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक मोहिम राबवली होती. या मोहिमेत 500 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला चांगलीच धडकी भरल्याचं बोललं जात आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने हल्ला केल्यास पाकिस्तानातील सर्व राजकीय पक्षांकडून विरोध केला जाणार असल्याचं पाकिस्तानचे माजी विदेश मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी सांगितलंय तर पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा काहीही हात नसल्याचा दावा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलायं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube