अमित शाह भेट वैयक्तिक मग सरकारी तिजोरीवर भार का? अंजली दमानियांचा प्रश्न अन् अनेक चर्चांना उधाण

Anjali Damania On Sunil Tatkare : काहीदिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) रायगडच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या घरी स्नेहभोजणासाठी पोहचले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या या दौऱ्यासाठी राज्य सरकारकडून रायगडमध्ये चार हेलिपॅड तयार करण्यात आले होते. मात्र आता या हॅलिपडवरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत राज्य सरकारवर टीका केली आहे. अंजली दमानिया यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे की, जनतेच्या कष्टाने कमवलेल्या करायच्या पैशातून तटकरेंसाठी खास HELIPAD? ती पण चार चार Helipad? अमित शाह भेट वैयक्तिक होती. तो भार सरकारी तिजोरीवर कशासाठी? अमित शाह ना जेवायला घालायचय, खुशाल घाला. सोन्याच्या ताटात घालायचंय तरी घाला. ते आमच्या कष्टाच्या पैशाने कशासाठी? तटकरेंच्या अफाट कंपन्या आहेत ना ? मग त्यांनी वैयक्तिक खर्च करावा देवेंद्र फडणवीसांचे पुनःश्च अभिनंदन. सिंचन घोटाळा विसरून नवीन सरकार मधे खूपच चांगला ताळमेळ जाणवतोय. असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.
जनतेच्या कष्टाने कमवलेल्या करायच्या पैशातून तटकरेंसाठी खास HELIPAD? ती पण चार चार Helipad?
अमित शाह भेट वैयक्तिक होती. तो भार सरकारी तिजोरीवर कशासाठी?
अमित शाह ना जेवायला घालायचय, खुशाल घाला. सोन्याच्या ताटात घालायचंय तरी घाला. ते आमच्या कष्टाच्या पैशाने… pic.twitter.com/nn5RRhw18U— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 18, 2025
राज्य सरकारकडून अमित शाह यांच्या दौऱ्यापूर्वी रायगडमध्ये हेलिपॅड उभारणीसंदर्भातील निविदा प्रसिद्ध करण्यात आली. या निविदावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय उत्तर येतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
RBI ची मोठी कारवाई, ‘या’ 3 मोठ्या बँकांवर ठोठावला लाखोंचा दंड