‘आमचा औरंगजेब सुतारवाडीत बसलाय…’, महायुतीत पुन्हा वाद? सुनील तटकरेंवर शिंदेंच्या शिवसेनेची जहरी टीका

Shivsena Criticism of Sunil Tatkare : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून मतभेद दिसून येत आहे. सध्या महायुतीमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद निर्माण झाला आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावर शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) दावा केल्याने रायगड पालकमंत्री पद कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच आता शिवसेना आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर टीका करत त्यांची थेट तुलना औरंगजेबशी केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माणगाव येथील क्रिकेटच्या एका सामन्यात मंत्री भरत गोगावले (Bharat Gogavale) यांना पालकमंत्रीपदावरून टोला लावला होता. पंचांचा निर्णय अंतिम असतो, असं तटकरे म्हणाले होते. तर आता यावरूनच आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील क्रिकेटच्या मैदानावरूनच सुनील तटकरे यांना उत्तर दिले आहे. पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि या सामन्यात तुम्ही कप्तान होताना सगळंच तुम्हाला मिळणार असं चालणार नाही, आम्हाला क्रिकेटचं उदाहरण देऊ नका. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहे. असं यावेळी आमदार महेंद्र थोरवे म्हणाले.
पुढे बोलताना आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, राजकारण करायला गेले कर तिथे तुम्हाला क्षणिक सुख मिळेल, परंतु पुढील काळात याचे आपणास भोगाने लागतील. तसंच छावा या चित्रपटातील औरंगजेबाचं उदाहरण देत त्यांनी सुनील तटकरे यांची तुलना थेट औरंगजेबशी केली. आमचा औरंगजेब हा सुतारवाडीत बसलाय, अशी टीका त्यांनी यावेळी सुनील तटकरे यांच्यावर केली. या टीकेवर सुनील तटकरे काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
वरुण-विराटची कमाल रोहितला मात्र धक्का.. आयसीसी रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा
जानेवारीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची नियुक्ती केली होती. या यादीत रायगडचे पालकमंत्रीपद अदिती तटकरे (Aditi Tatkare) आणि नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना देण्यात आले होते मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाला विरोध केला होता त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली होती. तेव्हापासून नाशिक आणि रायगडचे पालकमंत्रीपद अद्याप रिक्त आहे.