संजय राऊतांमुळेच शिवसेना ठाकरे गटाचं वाटोळं झालंय; राधाकृष्ण विखे पाटलांचा थेट घणाघात

Radhakrishna Vikhe Patil : राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जायकवाडीबाबत बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी उजव्या कालव्याचे दुरुस्तीचे काम बऱ्यापैकी सुरू आहे. डाव्या कालव्याची अवस्था वाईट आहे. कालव्यात सोडलेल्या पाण्याला गळती लागत असेल तर त्याचा सिंचनावर आणि धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यावर परिणाम होतो असं मत व्यक्त केलं. (Vikhe Patil ) त्याचबरोबर ते शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही बोललेत. संजय राऊत यांच्यामुळेच स्वतःच्या पक्षाचे वाटोळं केलंय. त्यामुळे त्यांना वेगळ लढण्याशिवाय पर्याय नाही असं विखे पाटील म्हणालेत.
वाल्मिक कराडला रसद पुरवणाऱ्यावरही कारवाई करा, बजरंग सोनवणेंचा नाव न घेता धनंजय मुंडेव वार
विभागीय आयुक्त कार्यालयात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर माध्यमांना त्यांनी सांगितले, जायकवाडी, नांदूर मधमेश्वर, निम्न दुधना, ऊर्ध्व पैनगंगा, निम्न मानार, पूर्णा, विष्णुपुरी अशा सात प्रकल्पांबद्दल प्रामुख्याने चर्चा झाली. प्रत्येक प्रकल्पातून किती आवर्तने देऊ शकतो, यावर निर्णय झाला. लोकप्रतिनिधींचा कालव्यांच्या दुरुस्त्या कराव्यात, असा आग्रह होता. यासाठी विशेष दुरुस्ती कार्यक्रम हाती घेण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सिंचनाबाबत आमदारांच्या सूचना
पाणीपट्टी वसुली करण्याच्या सूचना विखे यांनी दिल्या. पाणीपट्टी वसुलीसाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी असेल. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी दिली. जिथे मनुष्यबळ कमी, तिथे कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडे जबाबदारी दिली जाईल. विष्णुपुरीमध्ये गाळ साचलेला आहे. तो गाळ काढण्यासाठी हेमंत पाटील यांनी प्रत्यक्ष व बैठकीला ऑनलाइन उपस्थित असलेले खासदार अशोक चव्हाण यांनी आग्रही मागणी केली. त्यानुसार गाळ काढण्यासाठी मंजुरी दिली आहे. प्रत्येक आमदारांनी आपल्या मतदारसंघामध्ये प्रभावी सिंचन कसे करता येईल, या दृष्टीने आमदारांनी बैठकीत सूचना केल्या.
उंचीवाढीला विरोधच
नदीजोड प्रकल्पासाठी राज्य सरकार तर निधी देणार आहेच, शिवाय केंद्राचा जास्तीत जास्त निधी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. गोदावरी खोऱ्यात ७ टीएमसी पाणी आणण्यासाठी आराखड्यासाठी ६४ कोटींच्या निधीला मंजुरी आहे. जायकवाडी भरल्यानंतर त्यातून वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी बॅरेजेस बांधणे गरजेचे आहे. अलमट्टी धरणाच्या उंचीमुळे आताच सांगली, सातारा जिल्ह्यात पाण्याच्या फुगवट्यामुळे संकट निर्माण होते. यामुळे अलमट्टीची आणखी उंची वाढवण्याला राज्य शासनाचा विरोधच असल्याचे विखे म्हणाले.