PM Modi On Pahalgham Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी (Pahalgham Attack) निष्पाप नागरिकांना ज्या क्रूरतेने मारले त्याबद्दल संपूर्ण देश दुःखी आहे. संपूर्ण राष्ट्र सर्व पीडित कुटुंबांच्या दुःखात त्यांच्यासोबत असून आता दहशतवाद्यांची जी काही थोडीफार जमीन उरली आहे ती नष्ट करण्याची वेळ आली असल्याचे म्हणत त्यांना ‘मिट्टी में मिलाने का वक्त आ गया है’ असा थेट इशारा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. पहलगाम हल्ल्यावर नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) पहिल्यांदाच जाहीरपणे प्रतिक्रिया दिली आहे. ते बिहारमधील मधुबनी येथे आयोजित एका जाहीर सभेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आणि नंतर भाषणाला सुरूवात केली.
Video : कपाळाच्या टिकल्या काढल्या अन् ‘अल्ला हू अकबर’ म्हटलं पण..पवारांना सांगितली आपबिती…
पहलगामवर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी ज्या क्रूरतेने निष्पाप लोकांना मारले त्याबद्दल संपूर्ण देश दुःखी आहे. संपूर्ण राष्ट्र सर्व पीडित कुटुंबांच्या दुःखात त्यांच्यासोबत आहे. या हल्ल्यात कोणीतरी आपला मुलगा, भाऊ किंवा पती गमावला. त्यापैकी काही बंगाली बोलत होते, काही कन्नड बोलत होते, काही मराठी, उडिया, गुजराती बोलत होते आणि काही बिहारचे होते.
आज, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, त्या सर्वांच्या मृत्यूबद्दलचे आपले दुःख सारखेच आहे. हा हल्ला केवळ निःशस्त्र पर्यटकांवरच झाला नाही; देशाच्या शत्रूंनी भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचे धाडस केले असल्याचे मोदी म्हणाले. देशाच्या शत्रूंनी भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचे धाडस केले आहे. ज्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला, ज्यांनी या हल्ल्याचा कट रचला त्यांना कल्पनाही करता येणार नाही त्यापेक्षा मोठी शिक्षा मिळेल. दहशतवादाचा नायनाट करण्याची वेळ आली आहे असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले.
मोदींच्या भाषणावर यूजर्सकडून फक्त आणि फक्त बदल्याच्या प्रतिक्रिया
एकीकडे पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यावर यू-ट्यूबवर मोदींचं भाषण ऐकणाऱ्या करोडो यूजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात अनेकांना या हल्ल्याचा सूड घेण्याची मागणी केली आहे. तर, काही यूजर्सने लिहिले की, आम्हाला संपूर्ण पाकिस्तान हवा आहे. एका यूजरने लिहिले की, पीओके परत घेणे हा पाकिस्तानसाठी योग्य उपाय आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, आम्हाला फक्त पीओके हवे आहे, दुसरे काही नाही.
पाकिस्तानला घाम फोडणारी CCS नक्की काय? एकाच बैठकीने शेजारी देशात खळबळ!
पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी 48 तासांचा कालावधी
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) पहलगामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर काल (दि.23) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या निवासस्थानी सुरक्षा समितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ज्यात…
1. 1960 चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात येईल, जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवादाला विश्वासार्ह आणि अपरिवर्तनीयपणे पाठिंबा देत नाही.
2. एकात्मिक चेकपोस्ट अटारी तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येईल. वैध मान्यतांसह ज्यांनी त्या मार्गाने ओलांडले आहे ते 1 मे 2025 पूर्वी त्या मार्गाने परत येऊ शकतात.
3. पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पाकिस्तानी नागरिकांना भूतकाळात जारी केलेले कोणतेही SPES व्हिसा रद्द मानले जातील. SPES व्हिसा अंतर्गत सध्या भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी 48 तासांचा कालावधी आहे.
Pahalgam Terror Attack : भारताचा पाकिस्तानवर ‘डिजिटल स्ट्राईक’, अधिकृत X अकाउंट केले बॅन
4. नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्कर, नौदल आणि हवाई सल्लागारांना पर्सना नॉन ग्राटा घोषित करण्यात आले आहे. त्यांना भारत सोडण्यासाठी एक आठवडा आहे.
5. भारत इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून स्वतःचे संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागार मागे घेणार आहे. संबंधित उच्चायुक्तालयातील ही पदे रद्द मानली जातील.