पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला मोठा दणका! 5 महत्वाचे निर्णय, ‘फक्त 48 तासांची मुदत…’

पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला मोठा दणका! 5 महत्वाचे निर्णय,  ‘फक्त 48 तासांची मुदत…’

India Strict Action Against Pakistan After Pahalgam Attack : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) पहलगामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर मोठे निर्णय घेतले आहेत. या हल्ल्यानंतर देशात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या निवासस्थानी सुरक्षा समितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीनंतर (Pahalgam Terror Attack) पररराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद पार पडली. केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात (Pakistan) कठोर पावले उचलल्याचं समोर आलंय.

‘दहशतवाद्यांना ठेचून मारा…’ कौस्तुभ गणबोटेंचे मित्र गहिरवले, आयुष्यात पहिल्यांदाच फिरायला गेला अन्…

या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर देखील उपस्थित होते. ही बैठक जवळपास तीन तास सुरु असल्याची माहिती मिळतेय. या बैठकीनंतर पररराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांच्या पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती देण्यात आलीय. या पहलगामा येथील हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे सीसीएसच्या बैठकीमध्ये पाकिस्तान (India-Pakistan) विरोधात कठोर पावलं उचलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर पुढे काय? सीसीएस बैठकीत चर्चा, शाह-डोभाल देखील उपस्थित

या दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य ओळखून, सुरक्षा मंत्रिमंडळ समितीने (CCS) खालील उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला.

1. 1960 चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात येईल, जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवादाला विश्वासार्ह आणि अपरिवर्तनीयपणे पाठिंबा देत नाही.

2. एकात्मिक चेकपोस्ट अटारी तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येईल. वैध मान्यतांसह ज्यांनी त्या मार्गाने ओलांडले आहे ते 1 मे 2025 पूर्वी त्या मार्गाने परत येऊ शकतात.

3. पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पाकिस्तानी नागरिकांना भूतकाळात जारी केलेले कोणतेही SPES व्हिसा रद्द मानले जातील. SPES व्हिसा अंतर्गत सध्या भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी 48 तासांचा कालावधी आहे.

4. नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्कर, नौदल आणि हवाई सल्लागारांना पर्सना नॉन ग्राटा घोषित करण्यात आले आहे. त्यांना भारत सोडण्यासाठी एक आठवडा आहे.

5. भारत इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून स्वतःचे संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागार मागे घेणार आहे. संबंधित उच्चायुक्तालयातील ही पदे रद्द मानली जातील.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube