Download App

मी शरद पवारांसोबत…पवारसाहेब मोदींकडून अनेक गोष्टी करुन घेऊ शकतात; विनोद तावडे

मी शरद पवारांसोबत...पवारसाहेब मोदींकडून अनेक गोष्टी करुन घेऊ शकतात, असं विधान भाजपचे नेते विनोद तावडे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केलंय.

Vinod Tawade : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचं राजकारण तापल्याची परिस्थिती आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आहे. अशातच पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान, भाजपचे नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत कौतूकाचे गोडवे गायल्याचं दिसून आले आहेत. अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांच्यावरील ग्रंथाचं इतर भाषेत भाषांतर करण्यासाठी मी शरद पवार यांच्यासोबत असेल, मोदी साहेबांकडून शरद पवारसाहेब अनेक गोष्टी करुन घेऊ शकतात, त्यामुळे मी शरद पवारांना मदत करणार असल्याचं विनोद तावडेंनी या कार्यक्रमात स्पष्ट केलंय. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात अण्णाभाऊ साठे-दलित आणि महिलांचे कैवारी ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीच्या मैदानात कुणाला उतरवायचं; फडणवीस करणार शिक्कामोर्तब

विनोद तावडे पुढे बोलताना म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी मोठं काम केलं असून चवळवळीत त्यांचं योगदान राहिलंय. अण्णाभाऊंच्या साहित्याला केवळ दलित साहित्य म्हणणं हा त्यांच्यावर अन्याय वाटतो, क्रांतीच्या ठिणग्या अण्णाभाऊंच्या लिखाणात पाहायला मिळतात, समाजातील ढोंगीपण त्यांनी लिखाणातून सहजपणे मांडलंय. त्यांचं साहित्य ओटीटीच्या माध्यमातून समाजासमोर आलं पाहिजे, हे साहित्य देशाचं असून देशभरात पोहोचवणं गरजेचं असल्याचं विनोद तावडेंनी स्पष्ट केलंय.

सोनियाजींच्या घरी मोलकरीण नव्हती म्हणून तुम्ही भांडे घासायला गेलता का?, शिंदे गटाची ठाकरेंवर टीका

कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले, विश्वास पाटील यांनी किती योगदान दिलंय हे सांगण्याची गरज नाही, त्यांनी पानिपत राज्यातील कानाकोपर्यात पोहोचवलंय. आता अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दलही लिहलं आहे. अण्णाभाऊ साठे यांचं लिखाण प्रसिद्ध झालंय, त्याचा प्रकाशन सोहळा होतोयं, सगळा वर्ग इथं झाडून आला असल्याचं शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

Durga Promo: ‘कलर्स मराठी’वर नव्या मालिकांचा धडाका; ‘दुर्गा’ मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित

माझी मैना गावाकडं राहिली काव्य अनेकदा ऐकायला मिळतं…
अण्णाभाऊ साठे यांचा शिराळा तालुका संघर्ष करणारा आहे. तिथून अण्णांच्या संघर्षाला सुरुवात झालीयं. अण्णाभाऊ साठे स्वातंत्र्यसैनिकांच्या साताऱ्यातून आलेले आहेत. प्रतिकूल परिस्थितीतून आलेले अण्णा मुंबईला चालत गेले. मुंबईत त्यांनी गिरणी कामगारांची जबरदस्त चळवळ उभी केली. त्यांच्या लिखाणात त्यांना भरपूर मान्यता मिळाली. माझी मैना गावाकडं राहिली हे काव्य अनेकदा ऐकायला मिळत असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी मागणी करावी लागत आहे, हे दुर्देवी आहे. माहिती पुरवून अण्णाभाऊ यांना भारतरत्न मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.

follow us