फडणवीस यांच्या भेटीपूर्वी विनोद तावडेंची अमित शहांच्या घरी हजेरी! महाराष्ट्र भाजपामध्ये होणार मोठा बदल?

फडणवीस यांच्या भेटीपूर्वी विनोद तावडेंची अमित शहांच्या घरी हजेरी! महाराष्ट्र भाजपामध्ये होणार मोठा बदल?

Vinod Tawde Met Amit Shah : लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result) जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. महायुतीला (Mahayuti) 48 जागांपैकी फक्त 19 जागा जिंकता आल्याने भाजपसाठी (BJP) हा मोठा धक्का मानला जात आहे.

महायुतीमध्ये भाजपला 9, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (Shiv Sena) 07 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) अवघ्या एक जागेवर समाधान मानावे लागले आहे. यामुळे राज्यात महायुतीला अपेक्षाप्रमाणे यश मिळाला नसल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारमधून मला मुक्त करावे अशी विनंती पक्ष नेतृत्वाकडे केली आहे तर आज गुरुवारी सायंकाळी देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याशी या प्रकरणात चर्चा करणार आहे.

मात्र त्यापूर्वी अमित शहा यांच्या घरी जाऊन भाजप सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या उमेदवारासाठी राज्यात 15 पेक्षा जास्त सभा घेतल्या होत्या मात्र तरीही देखील भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्याने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही ही गोष्ट गंभीरतेने घेतली आहे.

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारली असून राजीनामाची तयारी दर्शवली आहे यामुळे भाजपसह महायुतीमध्ये मोठी खळबळ माजली आहे.

विनोद तावडे अमित शहांच्या भेटीला पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी 05 जून रोजी आपली भूमिका जाहीर केल्यानंतर भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांनी अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असून राज्यातील राजकीय स्थितीवर चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसात भाजप केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्र भाजपमध्ये मोठे फेरबदल करण्याची तयारी करत आहे.

भलतंच, राहुल गांधींनी पराभव केला; मंत्री म्हणतात एक वर्ष लोकांची कामच करणार नाही

फडणवीस मोदी, शहांशी करणार चर्चा लोकसभा निकालानंतर पहिल्यांदाच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी भेट घेणार आहे. या भेटीमध्ये महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर आणि आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज