भलतंच, राहुल गांधींनी पराभव केला; मंत्री म्हणतात एक वर्ष लोकांची कामच करणार नाही

भलतंच, राहुल गांधींनी पराभव केला; मंत्री म्हणतात एक वर्ष लोकांची कामच करणार नाही

Lok Sabha Elections 2024 : निवडणूक म्हटलं की हार जीत सुरुच असते. परंतु, बऱ्याचदा असंही घडतं की (Lok Sabha Elections 2024) पराभूत झालेल्या उमेदवारांना त्यांचा पराभव चांगलाच जिव्हारी लागतो. हाच राग लोकांवर काढला जातो. असाच प्रकार उत्तर प्रदेशातील रायबरेली (Uttar Pradesh) मतदारसंघात घडला आहे. या मतदारसंघातून काँग्रेस नेते राहुल गांधी निवडणूक (Rahul Gandhi) लढत होते. त्यांनी या निवडणुकीत उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री दिनेश प्रताप सिंह पराभूत झाले. यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी एक वर्ष सुट्टी घेणार असल्याचे जाहीर केले. मतदारसंघातील लोकांच्या कामांपासून दूर राहणार आहोत. आता लोकांनी राहुल गांधींकडूनच कामं करून घ्यावीत, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्याची आता जोरदार चर्चा होत आहे.

Elections Results : आम आदमीचा ‘चक्रव्यूह’ भेदत भाजपनं दिल्ली जिंकली; ‘हा’ प्लॅन ठरला किंगमेकर

दिनेश प्रताप सिंह यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले राहुल गांधींनी हा विजय स्वतःच्या कष्टावर मिळवलेला नाही. त्यांना समाजवादी पार्टीने विजयी केलं आहे. जर समाजवादी पार्टीने साथ दिली नसती तर राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक जिंकू शकले नसते. आता बरंच राजकारण झालं आहे. त्यामुळे आता एक वर्षापर्यंत राजकारण बाजूला ठेऊन कुटुंबाला वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. एक वर्षापर्यंत लोकांपासून दूर राहणार आहे. लोक आता आपली कामं राहुल गांधींकडून करुन घेतील. राहुल गांधींनी जबाबदारी घ्यावी. दर शनिवार आणि रविवारी त्यांनी येथे बसावं आणि लोकांच्या समस्या ऐकून त्यावर मार्ग काढावा, असे सांगितले.

मागील दहा वर्षांपासून दिनेश प्रताप सिंह रायबरेलीच्या राजकारणात सक्रिय आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी सोनिया गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढली होती. या निवडणुकीआधी सन 2018 मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. याआधी ते काँग्रेसमध्येच होते. सन 2010 आणि 2016 मध्ये ते विधानपरिषदेचे आमदार होते. 2022 मध्ये त्यांनी तिसऱ्यांदा आमदारकी मिळवली. यानंतर योगी आदित्यनाथ सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदी संधी देण्यात आली.

Election Result : सहा राज्यांनी घेतली भाजपाची शाळा; राजधानी दिल्लीची ‘वाट’ ही केली अवघड

उत्तर प्रदेशात भाजपाची दाणादाण

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा येतात. या राज्यात जो जिंकेल तोच दिल्लीत सत्ताधीश होईल असं मानलंं जातं. याआधीच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या जनतेनं भाजपला भरभरुन मतदान केलं. 2019 च्या निवडणुकीत भाजपला तब्बल 62 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे यावेळेसही उत्तर प्रदेश पाठिशी राहिल असा अंदाज भाजप नेत्यांचा होता.

विरोधी इंडिया आघाडीने मात्र भाजपचे सगळेच मनसुबे धुळीस मिळवले. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आणि काँग्रेस नेते राहुल गांधी या दोघांची जादू चालली आणि भाजपला 31 जागांचा फटका गेली. या राज्यात इंडिया आघाडीचे डावपेच, तिकीट वाटपात घेतलेली खबरादारी, भाजपला फायदा होईल असा प्रचार करणं टाळलं या कारणांमुळे समाजवादी पार्टीने राज्यात 35 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज