Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट आहेत. काश्मीरात कडेकोट बंदोबस्त आहे. या हल्लेखोर दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी सैन्याकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात येत (Indian Army) आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. यातील तीन दहशतवादी पाकिस्तानी आहेत आणि दोघे जण काश्मीरी आहेत. दरम्यान, शोध मोहिमेदरम्यान बांदीपोरा येथे लष्कर ए तैयबाच्या चार दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, उधमपूरमध्ये झालेल्या चकमकीत सैन्यातील एक जवान शहीद झाल्याची माहिती आहे.
गुरुवारी पूंछ जिल्ह्यातील लसाना जंगलात भारतीय सैन्याने जम्मू काश्मीर पोलिसांच्या मदतीने सर्च ऑपरेशन सुरू केले. या मोहिमेत जवान जंगल आणि दरी खोऱ्यात जाऊन दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. इतकेच नाही पहलगाममधील हल्लेखोरांना कोणत्याही परिस्थितीत शोधून काढण्याचा निश्चय सरकारने केला आहे. जो कुणी या दहशतवाद्यांची माहिती देईल त्याला रोख बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे.
पाकिस्तानला घाम फोडणारी CCS नक्की काय? एकाच बैठकीने शेजारी देशात खळबळ!
या भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. भारतीय सैन्याने ठिकठिकाणी शोध मोहिम सुरू केली आहे. याच मोहिमेत उत्तर बांदीपोरा जिल्ह्यातून चार दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणातील शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. यानंतरही या भागात सर्च ऑपरेशन सुरुच राहणार आहे.
जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे काल (Pahalgam Terror Attack) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. हल्ल्यात या अतिरेक्यांनी हिंदू धर्मियांना टार्गेट केलं. त्यांची धार्मिक ओळख आणि नावं विचारून (Jammu Kashmir Attack) त्यांना गोळ्या घातल्या. भारताचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जाणारं पहलगाम रक्तरंजित झालं. या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
1. 1960 चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात येईल, जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवादाला विश्वासार्ह आणि अपरिवर्तनीयपणे पाठिंबा बंद करत नाही.
2. एकात्मिक चेकपोस्ट अटारी तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येईल. वैध मान्यतांसह ज्यांनी त्या मार्गाने ओलांडले आहे ते 1 मे 2025 पूर्वी त्या मार्गाने परत येऊ शकतात.
3. पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पाकिस्तानी नागरिकांना भूतकाळात जारी केलेले कोणतेही SPES व्हिसा रद्द मानले जातील. SPES व्हिसा अंतर्गत सध्या भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी 48 तासांचा कालावधी आहे.
4. नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्कर, नौदल आणि हवाई सल्लागारांना पर्सना नॉन ग्राटा घोषित करण्यात आले आहे. त्यांना भारत सोडण्यासाठी एक आठवडा आहे.
5. भारत इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून स्वतःचे संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागार मागे घेणार आहे. संबंधित उच्चायुक्तालयातील ही पदे रद्द मानली जातील.
‘दहशतवाद्यांना ठेचून मारा…’ कौस्तुभ गणबोटेंचे मित्र गहिरवले, आयुष्यात पहिल्यांदाच फिरायला गेला अन्…