Download App

Ashish Shelar: उद्धव ठाकरे यांचे हात मुंबईकरांच्या रक्तानं माखलेले

  • Written By: Last Updated:

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे हात रक्ताने माखलेले आहे, अशी जहरी टीका भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली आहे. २०२० मध्ये उद्धव ठाकरे सत्तेत असताना कमला मिल (Kamala Mill) आग प्रकरणातील अधिकाऱ्याला मुक्त केलं असल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी अशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

अशिष शेलार म्हणाले,‘उद्धव ठाकरे यांना नम्र विनंती करेल, आदित्य ठाकरे यांच्या नादी लागून या प्रकरणात पडू नका, तुम्ही आम्हाला आव्हानाने प्रश्न विचारत असाल तर तुमचे हात तरी स्वच्छ असायला हवेत, तुमचे हात मुंबईकरांच्या रक्ताने माखलेले आहेत, असे मी म्हटले तर खोटं ठरणार नाही.’, अशी घणाघाती टीकाही शेलार यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उत्तर द्या नोव्हेंबर २०२० मध्ये तुमचं सरकार होतं, त्यावेळी तुम्ही कमला मिल आणि रेस्टॉरंटच्या मालका तुम्ही का मुक्त केलं, असा सवाल आशिष शेलार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Tags

follow us