Ashish Shelar यांनी आपल्या पीएला हटवले आणि जगजाहीरही केले…

मुंबई :  भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आपला स्वीय सहाय्यक स्वप्नील कुलकर्णी याला पदावरून हटविले. याविषयी आशिष शेलार यांनी सकाळी फेसबुकवर घोषणा केली. एखाद्या नेत्याच्या पीएला हटविणे हि काही मोठी बाब नाही, परंतु शेलार यांनी हे जगजाहीर का केले ? या विषयीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहे. आशिष शेलार यांच्या […]

Ashish Shelar : 'राऊतांकडे 27 तर आमच्याकडे 270 फोटो'; भाजप नेत्याचा इशारा काय?

Ashish Shelar : 'राऊतांकडे 27 तर आमच्याकडे 270 फोटो'; भाजप नेत्याचा इशारा काय?

मुंबई :  भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आपला स्वीय सहाय्यक स्वप्नील कुलकर्णी याला पदावरून हटविले. याविषयी आशिष शेलार यांनी सकाळी फेसबुकवर घोषणा केली. एखाद्या नेत्याच्या पीएला हटविणे हि काही मोठी बाब नाही, परंतु शेलार यांनी हे जगजाहीर का केले ? या विषयीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहे.

आशिष शेलार यांच्या फेसबुक आणि ट्विटरवर सकाळी याची घोषणा केली होती. पण नंतर ट्विटरवरून ती पोस्ट हटवण्यात आली. स्वीय सहाय्य्क स्वप्नील कुलकर्णी याला पदावरून हटवल्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कॉमेंट येत आहेत, नेमकं त्यांना कोणत्या कारणावरून हटवण्यात आले आहे. हे अद्याप समोर आले नाही.

राजकीय नेत्यांचे पीए अनेक वादात अडकतात आणि त्यातून आपल्या नेत्याला अडचणीत आणतात, अशा आतापर्यंत अनेक घटना घडल्या आहेत. शेलार याना तर तसा अनुभव तरी आला नाही ना ? असा ही प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. शेलार याच्या या कृतीबद्दल अनेक प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत.

Exit mobile version