Ashish Shelar’s counterattack on UBT and MNS criticism of separating Mumbai from Maharashtra : राज्यातील महानगरपालिका निवडणुका आज जाहीर झाल्या आहेत. (Election) आजपासून निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांच्या एकमेकांवर टीका टीपण्णी सुरू झाली आहे. त्यात उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून आणि राज ठाकरेंच्या पक्षाकडून भाजपवर वारंवार मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची केली जाते. त्यावर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले आशिष शेलार?
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या टीकेवर शेलार म्हणाले की, मला असं वाटतं त्यांच्याकडे मुद्देच नाहीत ते भ्रम पसरवण्याचं काम करतात. मुंबई मराठी माणसाचीच आहे. मुंबई महाराष्ट्राची आहे. तसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेतही सांगितलं आहे की, जो पर्यंत सुर्य चंद्र आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राची आहे. असा फडणवीसांनाचा दाखला देत शेलारांनी ठाकरे बंधुंवर पलटवार केला आहे.
Video : पुणे मुंढवा भूखंड गैरव्यवहारात पार्थ पवारांचा सहभाग, विजय कुंभार यांनी दिला मोठा पुरावा
तसेच पुढे ते म्हणाले की, विरोधकांचा पराभवाचा मुहूर्त मराठी माणसाने ठरवलाय. तर नवाब मलिक अजित पवारांच्या गटाचे नेतृत्व करून येणार आहेत त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीची युती करू शकणार नाही. शिवाजीराव नलावडे हे त्यांचे कार्याध्यक्ष मला भेटले त्यांनाही हे सांगितले आहे. जागा वाटपाचा फार्मूला ठरलाय.
150 पेक्षा जास्त महानगरपालिकेत नगरसेवक निवडून आणणे हा आमचा फार्मूला आहे. एक-दोन दिवसात परत बसून कोण कुठे जागा लढवणार ठरवू. 150 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्यासाठी आम्ही अभ्यास करू. महायुतीचा महापौर मराठी असेल याबद्दल शंका निर्माण करण्याचे कारण नाही. आमचा सवाल उद्धवजींना आहे तुम्ही महापौर घोषित करा. तुमचा महापौर कुठल्या मोहल्यातला असेल त्याचं नाव सांगा.
