डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी महानगरपालिका कार्यालयावर विद्युत रोषणाई करा, वर्षा गायकवाड यांची मागणी

Varsha Gaikwad : दरवर्षी स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, महात्मा गांधी तसेच राष्ट्रीय सण उत्सवाच्या दिवशी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC)

Varsha Gaikwad

Varsha Gaikwad

Varsha Gaikwad : दरवर्षी स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, महात्मा गांधी तसेच राष्ट्रीय सण उत्सवाच्या दिवशी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ऐतिहासिक इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात येते. तशीच विद्युत रोषणाई 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) जयंतीदिनी करण्यात यावी अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सुद्धा एक राष्ट्रीय सणच आहे. या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीवर विद्युत रोषणाई करावी अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

कोकणी माणसावर ‘उबाठा’ चे बेगडी प्रेम, दीपक केसरकरांचा हल्लाबोल

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना पाठवलेल्या पत्रात खासदार वर्षा गायकवाड यांनी पुढे असे म्हटले आहे की, राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी जयंती असते. बाबासाहेब यांची जयंती हा सुद्धा एक राष्ट्रीय उत्सवच असून 13 एप्रिल व 14 एप्रिल 2025 रोजी महानगरपालिका इमारतीवर विद्युत रोषणाई करावी, असे या पत्रात म्हटले आहे.

जातनिहाय जनगणनेला मोदी, संघाचा विरोध; PM मोदींच्या होमपीचवरुन राहुल गांधींची तोफ

Exit mobile version