मुंबई : बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याचा काही प्रश्नच नाही. त्यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा स्विकारलेला नाही. त्यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे. मी त्यांना पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती केली आहे, अशी माहिती प्रदेश प्रभारी एच.के. पाटील (H.K. Patil) यांनी दिली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि एच.के. पाटील यांची आज वरळीतील थोरातांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
आमच्या काँग्रेस (Congress) पक्षाअंतर्गत बाबी आहेत. या विषयाला मिडियाने जास्त मोठे केले आहे. एच. के. पाटील (H. K. Patil) यांच्यासोबत सर्व विषयांवर चर्चा झाली. रायपूरच्या (Raipur) कार्यक्रमाला मी यावं असा त्यांनी आग्रह केला होता. आमच्या पक्षाचं मोठं अधिवेशन रायपूरला होणार आहे आणि मी जाणार आहे. काही मुद्दे आहेत ते राष्ट्रीय अध्यक्षांशी बोलून सोडवणार आहेत. माझ्या मनातील गोष्टी एच. के. पाटील यांच्याजवळ सांगितल्या आहेत, अशी माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली.
Uddhav Thakeray : पंतप्रधान काल भाकरी भाजायला गेले होते का…?
बाळासाहेब थोरातांसोबत झालेल्या बैठकीनंतर एच. के. पाटील म्हणाले, बाळासाहेब थोरात रायपूर येथील काँग्रेसच्या शिबीराला उपस्थित राहतील. काही गैरसमज आणि मतभेद तयार झाले आहेत. आमच्या बैठकीत त्या मुद्दांवर चर्चा झाली. थोरातांची संपूर्ण बाजू ऐकून घेतली आहे. बाळासाहेब थोरात लवकरच काँग्रेस अध्यक्षांची भेट घेतील, अशी माहिती काँग्रेसचे राज्य प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली.
बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याचा काही प्रश्नच नाही. त्यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा स्विकारलेला नाही. त्यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे. मी त्यांना पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती केली आहे. त्यांची संघटनेबद्दल नाराजी असली तरीदेखील रायपूरच्या कार्यक्रमाला उपस्थिती राहण्याची विनंती केली आहे आणि ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेऊन म्हणणं मांडणार आहेत, असे एच. के. पाटील म्हणाले.
राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये काही नाराजी किंवा मतभेद असतील तर ते दूर केले जातील. थोरात आणि नाना पटोले यांच्यात कोणतेही चर्चा झाली नाही. सत्यजित तांबे यांचा आजच्या बैठकीत विषय नव्हता, अशी माहिती एच. के. पाटील यांनी दिली.