Download App

दाल मखनीवर आडवा हात मारणं पडलं महागात; मुंबईतल्या प्रसिद्ध हॉटलनं ग्राहकाला सर्व्ह केला शिजलेला उंदीर

Mumbai News : मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये (Mumbai News) धक्कादायक घटना घडली आहे. ऑनलाईन ऑर्डर केलेल्या जेवणामध्ये (Mumbai Restaurant) चक्क उंदीर निघाल्याचा दावा पीडित व्यक्तीने केला आहे. यानंतर त्या व्यक्तीला 75 तास रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते. राजीव शुक्ला असे पीडित व्यक्तीचे नाव आहे.

प्रयागराजमधील रहिवाशी असलेल्या राजीव शुक्ला मुंबईतील वरळी येथे कामानिमित्त आले होते. यावेळी भूक लागली म्हणून शुक्ला यांनी मुंबईतील बार्बेक्यू नेशनमधून (Barbecue Nation) शाकाहारी जेवण ऑर्डर केले होते.

यानंतर बार्बेक्यू नेशनविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र याप्रकारणी अद्याप एफआयआर नोंदवण्यात आला नसल्याचे पीडित व्यक्तीने सांगितले आहे. पीडित व्यक्तीने एका ट्वीटद्वारे याप्रकरणी मदतीची मागणी केली आहे.

मेलेला उंदीर पाहून धक्का बसला
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी लिहिले आहे की मी राजीव शुक्ला प्रयागराजहून (शुद्ध शाकाहारी) मुंबईला गेलो होतो. 8 जानेवारी 2024 रोजी, मी बार्बेक्यू नेशनच्या वरळी आउटलेटमधून व्हेज मील बॉक्स ऑर्डर केला होता. पण त्यामध्ये मेलेला उंदीर आढळलाा होता. मला 75 तासांपेक्षा जास्त काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी नागपाडा पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. कृपया मला मदत करा.

Pune Lok Sabha : रविंद्र धंगेकरांची दिल्लीवारी : काँग्रेसमध्ये चलबिचल, भाजपमध्ये चिंता

तक्रार करून उपयोग नाही
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजीव शुक्ला यांनी बार्बेक्यू नेशनच्या कस्टमर केअरला फोन करून तक्रार केली पण त्यांनी तक्रारीकडे लक्ष दिले नाही. त्यांनी नागपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रारही केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यांनी वांद्रे येथील अन्न व औषध प्रशासनालाही या प्रकरणाची माहिती दिली.

बार्बेक्यू नेशनने आरोप फेटाळले
बार्बेक्यू नेशननेही या पोस्टवर प्रतिक्रिया दिली असून आउटलेटचे प्रादेशिक अधिकारी राजीव शुक्ला यांच्या सतत संपर्कात असल्याचे सांगितले आहे. बारबेक्यू नेशनच्या वरळी आउटलेटने म्हटले आहे, त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली आहे आणि अशी कोणतीही गोष्ट समोर आली नाही.

अदानी करणार काँग्रेसशासित राज्यात 12 हजार कोटींची गुंतवणूक, दावोसमध्ये सामंजस्य करार

follow us