अदानी करणार काँग्रेसशासित राज्यात 12 हजार कोटींची गुंतवणूक, दावोसमध्ये सामंजस्य करार
Adani Group : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने भाजपवर अदानी-अंबानीची सरकार म्हणून टीका करत असतात. परंतु आता काँग्रेसचं सरकार असलेल्या राज्यात अदानी समूहाने 12400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणा सरकार आणि अदानी समूह (Adani Group) यांच्यात चार सामंजस्य करारही करण्यात आले आहेत. दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Revanth Reddy) आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या उपस्थितीत या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
5000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून 100 मेगावॅट डेटा सेंटर बांधणार
तेलंगणा सरकारच्या मते या गुंतवणुकीमुळे राज्याची आर्थिक प्रगती आणखी वाढेल. तसेच तेलंगणात हरित ऊर्जा विकासाच्या दिशेने अधिक चांगले काम करता येईल. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने 5000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह राज्यात 100 मेगावॅटचे डेटा सेंटर तयार करण्याचे मान्य केले आहे.
ते हरित ऊर्जेने विकसित होईल. साधारण 5 वर्षात हे डाटा सेंटर तयार होईल. या प्रकल्पासाठी राज्यातील सूक्ष्म आणि लघु उद्योग आणि स्टार्टअप्सचीही मदत घेतली जाईल, जे पुरवठादार म्हणून त्यात सामील होतील. यामुळे सुमारे 600 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
कुलभूषण जाधव यांच्या अपहरणाचा बदला इराणने घेतला, पाकिस्तानावर हवाई हल्ले
दोन पंप स्टोरेज प्रकल्प आणि सिमेंट प्लांटही सुरू होणार
याशिवाय, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड राज्यात सुमारे 5000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह दोन पंप केलेले स्टोरेज प्रकल्प देखील बांधणार आहे. यापैकी 850 मेगावॅटचा एक प्रकल्प कोयाबेस्तगुडम येथे तर दुसरा 500 मेगावॅटचा प्रकल्प नाचाराम येथे सुरू करण्यात येणार आहे. यासोबतच अंबुजा सिमेंट 5 वर्षात 1400 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 6 MTPA क्षमतेचा प्लांट देखील उघडणार आहे. हे युनिट 70 एकरांवर पसरणार आहे. यातून सुमारे चार हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
साखर उद्योगाला ‘अच्छे दिन’ : ‘मोलॅसिस निर्यातीवर’ केंद्र सरकारचा मोठा निर्णय
अदानी समूह ड्रोन आणि क्षेपणास्त्र प्रणालीमध्येही गुंतवणूक करणार
अदानी डिफेन्स सिस्टिम्स अँड टेक्नॉलॉजीजने 10 वर्षांत राज्यात सुमारे 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. या रकमेतून अदानी एरोस्पेस पार्कमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्र प्रणालीचे संशोधन, विकास, डिझाइन, उत्पादन आणि एकत्रीकरण केले जाईल. या प्रकल्पातून सुमारे एक हजार लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे.