कुलभूषण जाधव यांच्या अपहरणाचा बदला इराणने घेतला, पाकिस्तानावर हवाई हल्ले

कुलभूषण जाधव यांच्या अपहरणाचा बदला इराणने घेतला, पाकिस्तानावर हवाई हल्ले

Kulbhushan Jadhav : इराणने मंगळवारी पाकिस्तानातील जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेवर हवाई हल्ले केले. जैश अल-अदल सीमेपलीकडून इराणमध्ये दहशतवादी कारवाई घडवून आणत होता. याच संघटनेने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav) यांचे अपहरण केले होते. जैश अल-अदलच्या सदस्यांनीच कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण केले होते, त्यानंतर त्यांना आयएसआय या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात देण्यात आले होते.

जैश अल-अदलने कुलभूषण यांचे इराणमधील चाबहार येथून अपहरण केले होते. यानंतर त्यांना पाकिस्तानात नेण्यात आले होते. येथेच कुलभूषण यांना हेरगिरी प्रकरणात अडकवण्याचा कट रचला गेला. पाकिस्तानी एजन्सींनी जाधव यांना हेरगिरी प्रकरणात अडकवले, त्यानंतर तेथील न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. जाधव अजूनही पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. भारत सरकार त्यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कुलभूषण जाधव यांचे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयातही गाजले आहे.

जैश उल-अदल या दहशतवादी संघटनेवर इराणचा हल्ला
दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दोनच दिवसांपूर्वी इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी यांची भेट घेतली होती आणि या बैठकीच्या अवघ्या 48 तासांनंतर इराणने पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-उल-अदलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ला केला. या हल्ल्याचा संबंध कुलभूषण जाधव यांच्याशी जोडला जात आहे. कुलभूषण जाधव यांच्याविरोधात जैश-अल-अदल आणि पाकिस्तानने रचलेल्या कटाची ही शिक्षा असल्याचे मानले जात आहे.

साखर उद्योगाला ‘अच्छे दिन’ : ‘मोलॅसिस निर्यातीवर’ केंद्र सरकारचा मोठा निर्णय

जैश अल-अदलने इराणच्या सीमेवर हल्ला केला
गेल्या काही महिन्यांत जैश अल-अदलने इराणच्या सीमेवर अनेकदा दहशतवादी हल्ले केले होते. या हल्ल्यांबाबत इराणने पाकिस्तानकडे अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. गेल्या वर्षी डिसेंबर 2023 मध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला झाला होता. यामध्ये सुमारे 11 सुरक्षा जवान शहीद झाले होते. इराणने या घटनेवर तीव्र आक्षेप नोंदवत पाकिस्तानला फटकारले होते. पाकिस्तान आपल्या सीमांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, असे इराणने म्हटले होते.

‘मुख्यमंत्रिपदासाठी ‘महा’कपट केलं नसतं तर’.. भाजप नेत्याचा ठाकरेंना खोचक टोला

इराणच्या हल्ल्यात दोन मुलींचा मृत्यू झाला
इराणने जैश अल-अदलचे दोन तळ क्षेपणास्त्र आणि ड्रोनने उद्ध्वस्त केले आहेत. इराणच्या या हल्ल्यात दोन निष्पाप मुलींचा मृत्यू झाला आहे तर तीन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. इराणच्या या कृतीचा पाकिस्तानने निषेध केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube