‘मुख्यमंत्रिपदासाठी ‘महा’कपट केलं नसतं तर’.. भाजप नेत्याचा ठाकरेंना खोचक टोला
Ashish Shelar Criticized Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल महापत्रकार परिषद घेत राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नार्वेकरांनी मिंध्यांसोबत जनतेत येऊन सांगावं की खरी शिवसेना कुणाची असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले जात आहे. भाजप आमदार अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विट करत अत्यंत खोचक शब्दांत ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
◆दुर्योधन आणि शकुनी मामाच्या धोका आणि "महा" कपटामुळेच "महा"भारताचे युध्द झाले.
◆म्हणून पांडवांच्या हातून सर्व कौरवांचा "महा"नाश झाला.
तसेच
◆नेहमी एक खोटं लपवण्यासाठी "महा" खोटे बोलावे लागते!◆मुख्यमंत्रीपदासाठी "महा"कपट, "महा"धोका केला नसता…
◆अडीच वर्षे..असं काही ठरलं…— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 17, 2024
दुर्योधन आणि शकुनी मामाच्या धोका आणि “महा”कपटामुळेच “महा”भारताचे युद्ध झाले. म्हणून पांडवांच्या हातून सर्व कौरवांचा “महा”नाश झाला. तसेच नेहमी खोटं लपवण्यासाठी “महा”खोटे बोलावे लागते! मुख्यमंत्रिपदासाठी “महा”कपट, “महा”धोका केला नसता.. अडीच वर्षे.. असं काही ठरलं नसतानाही “महा”खोटं बोलला नसता… रोज सकाळी खोटं बोलणाऱ्या “महा” शकुनीला आवरले असते… तर.. अशी “महा” पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नसती. जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर!! जय श्रीराम!! असे शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
उद्धव ठाकरे सहकाऱ्यांना ‘सवंगडी’ नाही, ‘घरगडी’ समजतात’ मोदींसाठी CM शिंदे पुन्हा भिडले
जनतेत येऊन सांगा खरी शिवसेना कुणाची : उद्धव ठाकरे
दरम्यान, माझं तर आव्हान आहे की नार्वेकरांनी अन् शिंदेंनी माझ्यासोबत जनतेत उभा राहावं. पोलीस संरक्षण नाही. मी एक देखील पोलीस संरक्षण घेणार नाही. शिंदेंनी यावं, नार्वेकरांनी यावं. तिथं नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कोणाची? मग जनतेने ठरवावं कोणाला गाडावा, कोणाला पुरावा. माझ्यात हिंमत आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी कालच्या महापत्रकार परिषदेत केली होती.
जर का तुम्ही शिवसेना त्यांना विकली असेल तर ती म्हणजे विकाऊ वस्तू नाही. एवढं तुम्ही केल्यानंतरही मी जिथं जिथं जातो तिथं लाखो जनता, शिवसैनिक माझ्यासोबत कसे? आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो तर शिंदे गट उच्च न्यायालयात गेला. म्हणजे तिकडं पण टाईमपास करायचा आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
जाहीर पाठिंबा देतो, नार्वेकरांना हाकला; उद्धव ठाकरेंचे शिंदे गटाला आव्हान