‘उद्धव ठाकरे सहकाऱ्यांना ‘सवंगडी’ नाही, ‘घरगडी’ समजतात’; मोदींसाठी CM शिंदे पुन्हा भिडले

‘उद्धव ठाकरे सहकाऱ्यांना ‘सवंगडी’ नाही, ‘घरगडी’ समजतात’; मोदींसाठी CM शिंदे पुन्हा भिडले

Eknath Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (PM Narendra Modi) नाशिकमधील युवा महोत्सवात घराणेशाहीच्या राजकारणावर जोरदार टीका केली होती. घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचे मोठे नुकसान झाले असे मोदी म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरून आता राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कल्याण-डोंबिवलीतील गद्दारांच्या घराणेशाहीवर पंतप्रधान बोलले नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. दोन्ही नेत्यांच्या या शाब्दिक युद्धात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उडी घेत ठाकरेंना टोले लगावले. घराणेशाहीची व्याख्या उद्धव ठाकरेंनी सांगितली पाहिजे, असे आव्हान शिंदे यांनी दिले. ठाण्यातील कोपरी येथील श्री कौपनेश्वर महादेव मंदिरात शिंदे यांनी आज स्वच्छता अभियान राबवित पंतप्रधान मोदी यांच्या आदेशाची अंमलबजावणी केली. यानंतर त्यांना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

PM मोदींचे वर्षभरापूर्वी सुतोवाच अन् मुंबई महापालिकेच्या ठेवींमध्ये ‘सहा’ हजार कोटींची घट

उद्धव ठाकरे यांनी आधी घराणेशाहीची व्याख्या काय आहे ते सांगायला हवे. स्वतःचं घरही त्यांना अबाधित ठेवता आलं नाही. सर्वांनाच त्यांनी घराबाहेर काढलं. माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढंच त्यांचं मर्यादित काम होतं. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम केलं. बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी म्हणू वागवत होते. पण, उद्धव ठाकरेंनी पक्ष खासगी मालमत्तेसारखा चालवला. उद्धव ठाकरे सहकाऱ्यांना घरगडी समजतात. त्यामुळेत त्यांची अशी अवस्था झाली आहे, अशी घणाघाती टीका केली.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?

कल्याण-डोंबिवलीतील गद्दारांच्या घराणेशाहीवर पंतप्रधान बोलले नाहीत. ती घराणेशाही चालते का. गद्दार लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही प्राणप्रिय. हा सगळा बोगसपणा आहे. घराणेशाहीवर एका घरंदाज माणसाने बोललेलं चांगलं असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर आज मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

2024 मध्ये शरद पवार ‘चाणक्य’ राहतील का? एकनाथ शिंदे यांचे नवीन वर्ष कसे असेल, जाणून घ्या

follow us
  • fb
  • instagram
  • youtube