Download App

राज्यपालांनी 12 आमदारांची नावं लटकून का ठेवली? नेमकं कारण आलं समोर…

मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त 12 जागांसाठी नावं पाठवली होती, पण राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त होईलपर्यंत कोश्यारींनी (Bhagat Singh Koshyari) त्या यादीला मंजुरी दिलीच नाही. याचं नेमकं कारण अद्यापपर्यंत समोर आलेलं नव्हतं. आता एका मुलाखतीत भगतसिंह कोश्यारी यांनी गौप्यस्फोट करीत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) ठपका ठेवला. 12 आमदारांच्या नियुक्तीबद्दल लिहिलेल्या पत्रात कोश्यारींना नेमकं काय खटकलं, तेही समोर आलंय.

भगतसिंह कोश्यारी म्हणाले, महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ येत राहिली. मी त्यांना सांगितलं की, तुम्ही आधी हे पत्र बघा. पाच पानांचं पत्र आहे. ते प्रकरण नंतर सुप्रीम कोर्टात गेलं. पाच पानांच्या पत्रात तुम्ही राज्यपालांना धमकी देत आहात. कायदे सांगत आहात. आणि शेवटी लिहिता की, 15 दिवसांत मंजूर करा. कुठे लिहिलंय की, मुख्यमंत्री राज्यपालांना सांगू शकतो की मला इतक्या दिवसांच्या आत मंजूर करून पाठवा. संविधानात कुठे लिहिलं आहे? ते जेव्हा समोर येईल, तेव्हा तुम्हाला कळेल की सत्य काय आहे. तसं पत्र पाठवलं नसतं, तर मी पुढच्याच दिवशी त्यावर सही करणार होतो. तुम्ही असली पत्र लिहिता.

Election Commission : सुषमा अंधारेंनी निवडणूक आयोगालाही सोडलं नाही…

माझे उद्धव ठाकरेंबरोबर संबंध खूप चांगले होते, पण त्यांचे सल्लागार कोण होते? त्यांचे हेच सगळे आमदार येऊन मला सांगत होते की, साहेब तुम्ही आम्हाला वाचवा. उद्धव ठाकरे तर शकुनी मामाच्या जाळ्यात अडकले. माहिती नाही, त्यांचा कोण शकुनी मामा होता, असे कोश्यारी म्हणाले.

SambhajiRaje Chatrapati : शिवरायांची शपथ घेऊन सांगतो मला उद्धव ठाकरेंनी…

मला स्वतःच लोक बोलत होते. उद्धव ठाकरे तर संत माणूस आहेत. ते राजकारणात अडकले गेले. तुम्हाला माहितीये का उद्धव ठाकरे कसे फसले. पाच पानाचं पत्र लिहितात, त्यामुळे मी म्हणतोय. 15 दिवसांत मंजूर करा म्हणतात. माणूस जर सरळमार्गी, सज्जन नसता, राजकारणी असता, शरद पवारांसारख्या ट्रिक माहिती असत्या, तर असं लिहिलं असतं का? चार ओळीत लिहून पाठवलं असतं, तर सही करणं मला भाग पडलं असतं, असे कोश्यारी म्हणाले.

Tags

follow us