औरंगजेबाने सती प्रथा बंद केली… काशीच्या पंडितांनी औरंगजेबाच्या राण्या भ्रष्ट केल्या; नेमाडेंची मुक्ताफळे

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाचे (Aurangzeb) उद्दात्तीकरण करणाऱ्या अनेक गोष्टी राज्यात घडल्या. औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्यानं राज्यात दंगली झाल्या. अशातच आता ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडेंनी (Bhalchandra Nemade) औरंगजेबाबाबत मुक्ताफळे उधळली आहेत. औरंगजेबाने सती प्रथा बंद केल्याचा दावा नेमाडे यांनी केला आहे. त्यामुळं नवा वाद निर्माण झाला आहे. (bhalchandra nemade contravrsial statment on aurangzed Aurangzeb stopped […]

Untitled Design (4)

bhalchandra nemade

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाचे (Aurangzeb) उद्दात्तीकरण करणाऱ्या अनेक गोष्टी राज्यात घडल्या. औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्यानं राज्यात दंगली झाल्या. अशातच आता ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडेंनी (Bhalchandra Nemade) औरंगजेबाबाबत मुक्ताफळे उधळली आहेत. औरंगजेबाने सती प्रथा बंद केल्याचा दावा नेमाडे यांनी केला आहे. त्यामुळं नवा वाद निर्माण झाला आहे. (bhalchandra nemade contravrsial statment on aurangzed Aurangzeb stopped the practice of sati)

https://www.youtube.com/watch?v=qnJFFUhQCYQ

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातर्फे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी समारोप सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष शरद पवार आणि मराठी साहित्यिक भालचंद्र नेमाडे आणि हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलतांना नेमाडे म्हणाले की, आपल्याला इतिहासासंदर्भात माहिती हवी असेल तर पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. मी पण बरीच पुस्तके वाचली आहेत. त्यावरून मी काही निरीक्षणे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. औरंगजेबाच्या दोन राण्या होत्या. त्या काशीविश्वेश्वरला गेल्या होत्या. त्या परतल्याच नाहीत. कारण, काशीच्या पंडितांनी त्या दोन राण्यांना भ्रष्ट केलं. त्यामुळं औरंगजेबाने मोडतोड केली. तीच ज्ञानवापीची मोडतोड असल्याचा दावा नेमाडे यांनी केला आहे.

Cops Suspended In Pune : …म्हणून पोलिस उपायुक्तांनी 3 पोलिसांनी केलं निलंबित 

ते म्हणाले, औरंगजेबाच्या काळात निम्म्यापेक्षा जास्त हिंदू सरदार होते. औरंगजेब हा पहिला राजा होता ज्याने सती प्रथा बंद केली. सध्या रोज बातम्या येतात बायका भ्रष्ट केल्याच्या. साडेतीनशे लहान मुली पळवून नेल्या जातात. हे सहन होत नाही. इथं राहायचं तरी कसं, असा प्रश्न नेमाडेंनी उपस्थित केला.

नेमाडे म्हणाले, दुसऱ्या बाजीरावाबद्दल चुकीची माहिती दिली आहे. दुसरा बाजीराव चांगला होता. मला त्याच्यावर नाटक लिहायचं होतं. आपण जो इतिहास समजतो तो खरा नाही. इतिहास खऱ्या अर्थानं लिहावा लागेल, दुसरा बाजीराव मोठा माणूस होता. त्यांनी महाराष्ट्राला पेशव्यांच्या ताब्यातून वाचवले. पेशवे इंग्रजांपेक्षाही क्रूर होत्याचं नेमाडेंनी सांगितलं.

नेमाडेंनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलतांना सांगिलतं की, छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती मुस्लिम होते. तर औरंगजेबाचा मुख्य सेनापती हा हिंदू होता. तसेच औरंगजेबाच्या काळात हिंदू सरदारांची संख्याही वाढलल्याचं ते म्हणाले. तसेच मेंदूची क्षमता कमी होत असल्याने सरकारने स्मार्टफोन आणि इंग्रजी शाळांवर बंदी घालावी, असे आवाहनही नेमाडे यांनी केले.

Exit mobile version