Cops Suspended In Pune : …म्हणून पोलिस उपायुक्तांनी 3 पोलिसांनी केलं निलंबित
आरोपी पळून गेल्या प्रकरणी तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केली आहे. दरम्यान, आरोपीला न्यायालयातून येरवडा कारागृहात नेत असताना आरोप पळून गेल्याची घटना घडली होती. या आरोपीच्या बंदोबस्ताची जबाबदारी निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली होती. त्यानंतर पोलिस उपायुक्तांकडून पोलिस कर्मचाऱ्यांर निलंबनाची कारवाई करण्यात आलीयं.
NIA ने मुंबईत बॉम्बस्फोटाचा कट उधळला, ISIS च्या आकिफ नाचनला अटक
नेमकं प्रकरण काय?
मुरलीधर कोकणे, राजूदास चव्हाण, (इतर एक कर्मचारी) असं या पोलिस कर्मचाऱ्याचं नाव असून हे तिन्ही कर्मचारी पोलिस मुख्यालयात कोर्ट कंपनी म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर आरोपींना येरवडा कारागृहातून आरोपींना न्यायालयात आणि न्यायालयातून पुन्हा कारागृहात हजर करण्याची जबाबदारी होती. त्यानूसार त्यांनी 2 ऑगस्टला आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं. न्यायालयात राजेश कांबळे नामक आरोपीला पुढील तारीख देण्यात आली.
Dcm Ajit Pawar : ‘महाआरोग्य शिबिरातून नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार’
इतर आरोपींची सुनावणी सुरुच होती. यादरम्यान, पोलिस कर्मचारी राजूदास चव्हाण यांनी राजेश कांबळे याला खाजगी रिक्षाने येरवडा कारागृहात घेऊन जात असल्याचं सांगून आरोपी कांबळेला न्यायालायतून घेऊन गेला. त्याच्या या निर्णयाला इतर दोन्ही कर्मचाऱ्यांनी होकार दर्शवला होता. त्यानंतर पोलिस कर्मचारी चव्हाण यांनी आरोपीला रिक्षाने येरवडा कारागृहाकडे जात असतानाच कांबळे याने तहान लागल्याचं सांगितलं. आरोपी पाणी पिण्यासाठी वाटेत उतरताच साथीदाराच्या दुचाकीवर बसून पळून गेला होता.
दरम्यान, या प्रकरणाचा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पळून गेल्याप्रकरणी तिन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस उपायुक्तांच्या आदेशाने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.