Aryan Khan Cruise Drugs Case : तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या याचिकेत मोठा खुलासा करण्यात आला आहे. तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आल्याच्या आरोपांप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या याचिकेत समीर वानखेडे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. वानखेडे यांनी शाहरुख खानसोबत झालेल्या संभाषणाची प्रत जोडली असल्याची माहिती समोर येत आहे. या याचिकेवर अद्याप न्यायालयात सुनावणी सुरु झाली नसून थोड्याच वेळात सुनावणी सुरु होणार असल्याची माहिती आहे.
Former Zonal Director, NCB Mumbai, Sameer Wankhede files a petition in Bombay High Court, attaches his chats with actor Shah Rukh Khan in the petition.
— ANI (@ANI) May 19, 2023
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक झाल्यानंतर 3 आणि 4 ऑक्टोबरदरम्यान, शाहरुख खान आणि समीर वानखेडे यांच्यात व्हॉट्सॲप चॅट झाली होती. यासंदर्भातील प्रत समीर वानखेडेंनी याचिकेत जोडली आहे. या मेसेजमध्ये माझ्या मुलाची काळजी घे, अशी विनंती शाहरुख खानकडून समीर वानखेडे यांना करण्यात आली होती. तसेच वानखेडेंनी केलेल्या कारवाईचं शाहरुखकडून कौतूकही करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
ठाकरे गटाच्याच नेत्याची सुषमा अंधारेंना मारहाण, बीडमधील धक्कादायक प्रकार
तसेच सहकार्य केल्याबद्दल मी आभार मानतो, असं शाहरुख म्हटला असून त्यानंतर शाहरुखने स्वत: समीर वानखेडे यांना व्यक्तिगतपणे भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. या सर्व पुराव्यांची प्रत समीर वानखेडे याचिकेत जोडली आहे. त्यामुळे समीर वानखेडेंवर करण्यात आलेल्या लाच मागितल्याचा आरोप यावरुन सिद्ध होत नसल्याचं दिसून येतंय.
Maharashtra Politics : बच्चू कडूंचा संयम सुटला; मंत्रिमंडळ विस्तारावरुन थेट फडणवीसांना सुनावलं
प्रत्येक मेसेजेमध्ये मुलासाठी बाप या नात्याने जे काही करु शकत होता ते शाहरुख खानने केलं आहे. मात्र, शाहरुखच्या प्रश्नांना समीर वानखेडे यांनी दुजबी उत्तरे दिली आहे. दरम्यान, समीर यांनी कधीही शाहरुखशी स्वत:हुन संपर्क केलेला नव्हता, असं या मेसेजेसवरुन समोर आलं आहे.
समीर वानखेडे यांच्यात आणि शाहरुख खानमध्ये अनेकदा संभाषण झालं असून समीर वानखेडेंनी दोघांमध्ये झालेल्या संभाषणाची प्रत सादर केलीय. या याचिकेवर अद्याप सुनावणी सुरु झालेली नाही. दुपारनंतर सुनावणी सुरु होणार आहे.
Santosh Dagde: माउंट एव्हरेस्टवर झळकले कर्जतचे नाव
या सुनावणीमध्ये समीर वानखेडेंनी शाहरुख खानसोबत झालेल्या संभाषणाचा अहवाल सादर केल्यानंतर न्यायालयात काय होणार? याकडं सर्वांचच लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर ड्रग्जच्या वादग्रस्त छाप्यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला अटक करण्यात आली होती. तत्कालीन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली होती.
त्यानंतर वानखेडे यांच्यावर सीबीआयच्या आरोप पत्रामध्ये 25 कोटी रुपयांची खंडणी समीर वानखेडे यांनी मागितली असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर वानखेडेंना सीबीआयकडून समन्स पाठवले होते.