मुंबई – शिवसेना भावनावर (Shivsena Bhavan) आम्ही कोणताही दावा सांगणार नाही. शिवसेना भवन आमच्यासाठी मंदिर आहे. काही लोकांना शिवसेना भवन संपत्ती वाटत असेल पण आम्ही ज्यावेळी त्या रस्त्याने जाऊ त्यावेळी नमन करु, अशी आमची भूमिका राहणार आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी दिली आहे.
संजय शिरसाट पुढं म्हणाले, आमची लढाई ही शिवसेना फंड किंवा शिवसेना भवन बळकावणे यासाठी नव्हती. आम्हाला पक्षाचं नाव आणि चिन्ह महत्वाचं होतं. निवडणूक आयोगाच्या निर्णया अनुसरुन आज आम्ही पक्षाच्या कार्यालयात जाऊन बैठक घेतली.
शिवसेना पक्षाच्या सर्व 56 आमदारांना प्रतोदांनी सुचना दिल्या आहेत. पक्ष प्रतोद जो निर्णय देतील आणि त्यांनी दिलेल्या व्हीपचे उल्लंघन होणार नाही यांची काळजी घेण्याची सुचना उपस्थित आमदारांना शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिली असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
आम्ही पूर्वीपासून वापरत असलेल्या शिवसेना विधीमंडळ कार्यालयातून आजपासून कामकाजाला सुरुवात केली आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण पूर्णपणे दिलेले असल्याकारणाने इतर कार्यालयांचा निर्णय कायदेशीर बाजू तपासून पक्ष प्रमुख घेतील, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
Udhav Thackeray : निवडणूक आयोगाने दोन गट मान्य केले, शिंदे गटाचा व्हिप लागू होत नाही
जिल्हा नियोजन प्रतोदांची नियुक्ती अधिवेशना आधी होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लवकरच प्रतोदांच्या नियुक्त्या निश्चित करणार आहेत, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
शिवसेना पक्षाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत अधिवेशनासंदर्भात चर्चा झाली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमाला शिवसेनेच्या सर्व 56 आमदारांनी उपस्थित राहण्याच्या सुचना गोगावले यांनी दिल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.