Udhav Thackeray : निवडणूक आयोगाने दोन गट मान्य केले, शिंदे गटाचा व्हिप लागू होत नाही

Udhav Thackeray : निवडणूक आयोगाने दोन गट मान्य केले, शिंदे गटाचा व्हिप लागू होत नाही

मुंबई : शिंदे गटाचा व्हिप ठाकरे गटाला लागू होणार नाही. कारण ज्यावेळी निवडणूक आयोगाने दोन गट मान्य केले. त्यानुसार त्यांना आणि आम्हाला वेगवेगळं नाव आणि निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे. पण मूळ नाव आणि चिन्हाचा निर्णय बाकी होता. आता त्यांनी त्या गटाला शिवसेना हे नाव आणि चिन्ह दिलं आहे. त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही. त्यामुळे ठाकरे गटाला शिंदे गटाचा व्हिप लागू होत नाही. अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाजप (BJP), निवडणूक आयोग आणि शिंदे गटावर जोरदार प्रहार केले. त्यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरले, हा पूर्वनियोजित असा कटच आहे. जे धनुष्य रावणाला पेलले नाही. ते या मिंध्यांना काय पेलणार ? असा सवाल त्यांनी केला. महत्वाचे म्हणजे, आयोगाला चिन्ह व नाव देण्याचा असा निर्णय घेता येत नाही. मात्र, त्यांनी तसा निर्णय घेतला त्यामुळे आम्ही न्यायालयात याचिका दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

Uddhav Thackeray : निवडणूक आयोग बरखास्त करा, तिथेही निवडणुका घ्या; उद्धव ठाकरे कडाडले..

पक्षनिधीच्या मुद्द्यावर ठाकरे म्हणाले, की आयोगाला तिथे दरोडा घालता येणार नाही. जर तसा प्रयत्न त्यांनी केला तर त्याविरोधातही न्यायालयात जाऊ. आता 16 जण गेले त्यानंतर 23 अपात्र केल्याची नोटीस दिली आहे. दोन तृतीयांश एका पक्षात विलीन व्हायला हवेत मात्र तसं झालेलं नाही. मधल्या काळात एक वादग्रस्त आयुक्त नेमले गेले आणि घाईघाईत त्यांची नियुक्ती कशी काय झाली याचं उत्तर द्यायला हवं. निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य आहे. गुंता वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने निर्णय दिला का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. आता सर्वोच्च न्यायालयाकडूनच आम्हाला अपेक्षा आहेत त्यासाठी न्यायालयाला आम्ही आवाहन केल्याचेही ठाकरे यावेळी म्हणाले.

मला शरद पवार, ममता बॅनर्जींचा (Mamta Banarjee) फोन आला. नितीश कुमारांचा (Nitish Kumar) देखील फोन आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दूरध्वनीवर संवाद साधून, शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह हातून गेल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा केली. आता हे प्रकरण देशभरात पेटणार आहे. अशा पद्धतीने पक्ष संपविण्याचा प्रयत्न होत आहे की काय अशी भीती लोकांच्या मनात निर्माण झाली आहे.

आता पुन्हा संवाद

यानंतर आता राज्यभरात पुन्हा संवादाचा उपक्रम सुरू केला जाणार आहे. आधी आमची पथके गावागावात जाणार आहेत. तेथे लोकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर मी स्वतः सभा घेणार आहे, अशा पद्धतीने नियोजन केल्याचे ठाकरे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube