Download App

‘अश्वजीत’चा भाजपशी कोणताही संबंध नाही; आरोपांवर चित्रा वाघ यांनी सुनावलं

Chitra Wagh : एमएसआरडीचे संचालक अनिल गायकवाड यांचा मुलगा अश्वजीत गायकवाडने (Ashwajeet Gaikwad) प्रेयसी प्रिया सिंग (Priya Singh) हिच्या अंगावर गाडी घालण्याचा आणि तिला मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका होत असल्याचं दिसतयं. अशातच आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मैदानात उतरुन विरोधकांना सुनावलं आहे. अश्वजीत गायकवाडचा भाजपशी कुठलाही संबध नाही, त्यामुळे अश्वजीतला पाठिशी घालण्याचा प्रश्नच येत नसल्याचं चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलं आहे. वाघ यांनी जखमी प्रिया सिंगची रुग्णालयात जात भेट घेतलीयं.

अर्बन बँक घोटाळा! ठेवीदार संतापले, थेट माजी खासदाराच्या प्रतिमेला भर चौकात पायाखाली तुडवले

चित्रा वाघ म्हणाल्या, “सुरूवातीपासूनच पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वेगाने तपास सुरू केला. पीडितेचा जबाब नोंदवल्यानंतर तिच्या जबाबानुसार सेक्शन लावत FIR झाला आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांनी वापरलेली गाडी ही जप्त केली. या प्रकरणातलं गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एसआयटी देखील स्थापन केली आहे. तपासात ज्या-ज्या आरोपांची पुष्टी होईल, ती सगळी कलमं आरोपी आणि त्याच्या साथीदारांविरोधात पोलिसांकडून लावण्यात येतील. पीडितेने पोलिसांना संपूर्ण माहिती दिल्यास कठोर कारवाई होईल” असं चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच आरोपी अश्वजीत गायकवाड हा ५ ते ६ वर्षांपूर्वी भाजपा युवामोर्चाचा पदाधिकारी होता. मात्र, मागील 3 ते 4 वर्षात त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही. तो कुठल्या पदावरही नाही. यापुढे जात जरी तो पक्षाचा पदाधिकारी असता तरीही त्याला पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नसल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. आरोपी हा कुणी ‘बडे बाप का बेटा’ असला तरी कायद्यापुढे कुणाचीही गय केली जाणार नाही. हे महायुतीचं सरकार आहे..महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेची हमी असणारं सरकार आहे. त्यामुळे कुणालाही पाठीशी घातलं जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी महायुती सरकार हे कटीबद्ध असल्याचंही वाघ यांनी स्पष्ट केलं आहे.

सेटलमेंट न झाल्याने अदानींविरोधात मोर्चा काढला का? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना तिखट सवाल

नेमकं काय घडलं?
प्रिया सिंगच्या माहितीनूसार, अश्वजीत गायकवाडने फोन केल्यानंतर 11 डिसेंबर रोजी पहाटे साडेचार वाजता घोडबंदर रोडवरील एका हॉटेलजवळ कौटुंबिक कार्यक्रमात भेटायला गेले. पण माझ्या लक्षात आले की तो विचित्र वागत आहे आणि एकांतात बोलण्याची मागणी करत आहे.

पण मी नकार दिल्यानंतर त्याने मला थप्पड मारली, माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, मी त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने माझ्यावर हात उचलला, मला मारहाण केली, माझे केस ओढले. तेव्हा त्याच्या मित्राने मला जमिनीवर ढकलले, फोन आणि बॅग घेण्यासाठी मी माझ्या कारकडे धावली आणि तेव्हाच अश्वजीतने त्याच्या ड्रायव्हरला गाडी चालविण्यास सांगितले.

‘चोऱ्या केल्या म्हणूनच पक्षातून हाकललं’; महाजनांनी खडसेंचं सगळचं सांगितलं. माझ्या पायांवर गाडी गेल्यानंतर ते घटनास्थळावरून पळून गेले. या अपघातानंतर “माझ्या उजव्या पायाची तीन हाडे तुटली आहेत, त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. माझ्या डाव्या खांद्यापासून खालीपर्यंत मला खोलवर जखमा आहेत, असं प्रिया सिंग हिने आपल्या इन्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत सांगितलं आहे.

Tags

follow us