श्रीराम तोंडी लावायला आणि बसायचं कॉंग्रेसच्या पंगतीला; चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर जळजळीत टीका

  • Written By: Published:
श्रीराम तोंडी लावायला आणि बसायचं कॉंग्रेसच्या पंगतीला; चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर जळजळीत टीका

Chitra wagh : सध्या मध्य प्रदेशमध्ये निवडणुकांची लगबग सुरू आहे. या निवडणुकांच्या प्रचारसभेत बोलतांना गृहमंत्री अमित शाह यांनी जनतेला आश्वासन दिलं. मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आल्यावर भाविकांना रामलल्लाचे मोफत दर्शन दिले जाणार आहे. त्याचा खर्च भाजप सरकार उचलेल, असे शाह म्हणाले होते. यावर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाष्य केलं होतं. जय शिवाजी, हरहर महादेव, जय श्रीराम बोलून आम्हाला मतदार करा, असं ठाकरे बोलले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

खूशखबर! LPG गॅस सिलिंडरच्या दरात 57. 5 रुपयांची कपात, जाणून घ्या नवे दर 

महाविकास आघाडी अस्तित्वात येण्यापूर्वी राज्यात भाजप-सेना युती होती. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. शिवसेना राष्ट्रवादी, कॉंग्रेस सोबत गेली. यावरून शिवसेनेनं हिदूत्व सोडलं अशी टीकाही शिवसेनेवर झाली. दरम्यान, शिंदे गटात फुट पडून शिंदे गट भाजपसोबत गेला. हाच धागा पकडून चित्रा वाघ यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली. त्यांनी लिहिलं की, तुमच्या आव्हानाला विचारतो कोण उद्धवजी? या चिमण्यांनो परत फिरा रे, असं आवाहन करूनही कुणी तुमच्याकडे फिरकलं नाही… तुमच्या अनुयायांनी तुमचं नेतृत्व नाकारलं, यावर जरा आत्मपरिक्षण करा, असा सल्ला त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

World Cup 2023 : मिलरचे झुंजार शतक, आफ्रिकेकडून ऑस्ट्रेलियासमोर 213 धावांचे लक्ष्य 

त्यांनी लिहिलं की, आता निवडणुकीच्या तोंडावर जय श्रीरामचा नारा देऊन काही उपयोग नाही… श्रीराम तोंडी लावायला आणि बसायचं कॉंग्रेसच्या पंगतीला, हा तुमचा दुटप्पीपणा जनतेने कधीचाच ओळखलाय. प्रभ श्रीरामाचा हात सोडून उपद्रवी रावणसेनेचा हात पकडणाऱ्याच्या हाकेला कोण ओ देणार बरं उद्धवजी, अशी खोचक विचारणा चित्रा वाघ यांनी केली.

दरम्यान, शाह यांच्या वक्तव्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांचा समाचार घेतला होता. अमित शाह यांनी टूर अँड ट्रॅव्हल्सचे नवीन खाते उघडले असेल. निवडणूक जिंकण्यासाठी राम मंदिराचे आमिष का देता? निवडणूक जिंकायची असेल तर काय केलं ते सांगा, असं ते म्हणाले होते.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे म्हणाले, मोदींनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बजरंगबली की जय म्हणत मतदान करण्याचे आवाहन केले. मध्य प्रदेशात रामलल्लाचे दर्शन मोफत केले जाईल, अशी घोषणा शाह यांनी केली आहे. त्यांनी ही घोषणा केवळ मध्य प्रदेशसाठी करू नये. देशाच्या कानाकोपऱ्यात रामभक्त आहेत. त्या भाविकांना त्यांच्या सोयीनुसार मोफत अयोध्येला वारी करून द्यावी. पंतप्रधान जसे मतदानाचे बटण दाबण्यासाठी बजरंगबली की जय म्हणत असतात, त्याचप्रमाणे येत्या निवडणुकीत आम्ही जनतेला जय भवानी, जय शिवाजी; हर हर महादेव, जय श्री राम म्हणत मतदान करा, असं आवाहन करू, असं ते म्हणाले होते.

जय श्री राम म्हणत मतदान करा, या ठाकरेंच्या वक्तव्याचा चित्रा वाघ यांनी चांगलाच समाचार घेतला. त्यांच्या या टीकेला आता ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज